घरताज्या घडामोडीराज्यात 3098 नवे रुग्ण, तर मुंबईत 659 सक्रिय रुग्ण

राज्यात 3098 नवे रुग्ण, तर मुंबईत 659 सक्रिय रुग्ण

Subscribe

राज्यात मंगळवारी 3 हजार 098 कोरोनाच्या (Corona) नव्या रुग्णांची भर पडली आहे. राज्यभरात रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे मुंबईत असून, सध्या 659 सक्रिय रुग्ण आहेत.

राज्यात मंगळवारी 3 हजार 098 कोरोनाच्या (Coronavirus) नव्या रुग्णांची भर पडली आहे. राज्यभरात (Maharashtra) रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे मुंबईत असून, सध्या 659 सक्रिय रुग्ण आहेत. शिवाय, दिवसभरात एकूण 4 हजार 207 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. (new 3098 corona patients in maharashtra and 659 corona active cases in mumbai)

राज्यात सहा कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर हा 1.85 टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये 78 लाख 21 हजार 140 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 97.89 टक्के इतके झाले आहे.

- Advertisement -

राज्यात एकूण 20 हजार 820 सक्रिय रुग्ण संख्या आहे. त्यामध्ये मुंबईत सर्वाधिक म्हणजे 6 हजार 409 इतके रुग्ण असून, त्यानंतर पुण्यात 4 हजार 037 सक्रिय रुग्ण आहेत. याशिवाय देशात मागील 24 तासांत 12 हजार 456 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

मुंबई महापालिकेच्या आकडेवारीनुसार, मुंबईत मंगळवारी 1289 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ज्यामुळे मुंबईत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या 10 लाख 90 हजार 103 वर पोहोचली आहे. त्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट 98 टक्के इतका झाला आहे. तर मागील 24 तासांत एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 19 हजार 620 झाली आहे.

- Advertisement -

सध्या मुंबईत 6,409 रुग्ण आहेत. दरम्यान मुंबईत आढळलेल्या नव्या 659 रुग्णांमध्ये 619 रुग्णांना अधिक लक्षणं नसल्याने काहीसा दिलासा मुंबईकरांना मिळाला आहे. रुग्ण दुपटीचा दर आणि सक्रिय रुग्णसंख्यादेखील वेगाने वाढत आहे. रुग्ण दुपटीचा दर 762 दिवसांवर गेला आहे.

कोरोना महामारी सुरु झाल्यास देशात आतापर्यंत एकूण 4 कोटी 28 लाख 91 हजार 933 रुग्णांनी कोरोना संसर्गावर मात केली आहे. दरम्यान देशात आतापर्यंत 5 लाख 25 हजार 223 रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत.

देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत किंचित घट झाली आहे. भारताता आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या पाच लाखांच्या पुढे पोहोचली आहे. तर सक्रिय रुग्णांची संख्याही एक लाखाच्या पुढे गेली आहे. रविवारच्या तुलनेनं सोमवारी नोंद झालेल्या रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे.


हेही वाचा – नागरिकांच्या सुरक्षेसाठी ‘एनडीआरएफ’च्या ९, तर ‘एसडीआरएफ’च्या ४ टीम सज्ज

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -