घरताज्या घडामोडीशनिवारी राज्यात 734 नवे रुग्ण; 1216 रुग्ण कोरोनामुक्त

शनिवारी राज्यात 734 नवे रुग्ण; 1216 रुग्ण कोरोनामुक्त

Subscribe

राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी लसीकरण केले जात आहे. लसीकरण हा कोरोनावरील जालीम उपाय असल्याने ठिकठिकाणी लसीकरण मोहिम राबवली जात आहे. अशातच शनिवारी राज्यात 734 कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे.

राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी लसीकरण केले जात आहे. लसीकरण हा कोरोनावरील जालीम उपाय असल्याने ठिकठिकाणी लसीकरण मोहिम राबवली जात आहे. अशातच शनिवारी राज्यात 734 कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. आज 1 हजार 216 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येतही दिवसेंदिवस घट होताना पाहायला मिळत आहे. (new 734 corona patients in Maharashtra)

कोरोना रूग्णसंख्येसह राज्यातील कोरोना बाधितांच्या मृत्यूमध्ये देखील घट झाली आहे. शुक्रवारी राज्यात 6 बाधितांचा मृत्यू झाला होता. तर आज केवळ एका कोरोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.82 टक्के एवढा आहे.

- Advertisement -

राज्यात सध्या 6 हजार 578 कोरोनाचे सक्रिय रूग्ण आहेत. सर्वाधिक सक्रिय रूग्ण मुंबईत असून सध्या 1 हजार 900 सक्रिय रूग्ण आहेत. त्यानंतर पुण्यात 1 हजार 560 तर ठाण्यात 1 हजार 416 सक्रिय रूग्ण आहेत. राज्यात आजपर्यंत 79 लाख 55 हजार 268 करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.9 टक्के झाले आहे.

गेल्या 24 तासांत 5554 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 18 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्णसंख्येत 539 रुग्णांची घट झाली आहे. तर कोरोनाबळीही घटले आहेत. देशात गुरुवारी दिवसभरात 6 हजार 93 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, 31 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

गुरूवार आणि शुक्रवारच्या तुलनेत आजची संख्या खूपच कमी आहे. गुरुवारी राज्यात 1 हजार 76 कोरोनाच्या रूग्णांची नोंद झाली होती. त्यात घट होऊन शुक्रवारी 955 रूग्णांची नोंद झाली होती. तर यात आणखी घट होऊन शनिवारी 734 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे.


हेही वाचा – गणेश विसर्जनानंतर राजकिय नेत्यांकडून समुद्र किनाऱ्यांची सफाई

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -