घरमहाराष्ट्रOBC Bahujan Party : जरांगेंच्या आंदोलनामुळे आधी पक्षाची स्थापना; आता लोकसभेसाठी पहिली...

OBC Bahujan Party : जरांगेंच्या आंदोलनामुळे आधी पक्षाची स्थापना; आता लोकसभेसाठी पहिली यादी जाहीर

Subscribe

मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे राज्यात ओबीसी बहुजन पार्टी या नव्या पक्षाचा गेल्याच महिन्यात जन्म झाला. यावेळी ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी लोकसभेच्या 48 जागा लढवणार असल्याचे संकेत दिले होते. यानंतर आज त्यांनी राज्यातील आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. ओबीसी बहुजन पार्टीने आपल्या पहिल्या यादीत 9 उमेदवारांची घोषणा केली आहे. (OBC Bahujan Party The party was first formed due to the movement of Manoj Jaranges Now the first list for Lok Sabha has been announced)

हेही वाचा – NIlesh Lanke : अजित पवारांना मोठा धक्का; आमदारकीचा राजीनामा देत निलेश लंके शरद पवार पक्षात

- Advertisement -

ओबीसी बहुजन पार्टीच्या सुकाणू समितीची बैठक आज पार पडली. यांनी बैठकीत पक्षाच्यावतीने लोकसभा निवडणुकीत लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. ओबीसी बहुजन पार्टीचे अध्यक्ष प्रकाश शेंडगे यांनी 9 उमेदवारांची यादी जाहीर करताना स्वत: सांगलीतून निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच बारामतीतून महेश सिताराम भागवत, परभणीतून अॅड. हरिभाऊ शेळके, हिंगोलीतून अॅड. रवी यशवंतराव शिंदे, नांदेडमधून अॅड. अविनाश विश्वनाथ भोसीकर, यवतमाळमधून प्रशांत महादेव बोडखे, बुलढाण्यातून नंदू जगन्नाथ लवंगे, शिर्डीतून अशोक रामचंद्र आल्हाट आणि हातकणंगले येथून मनीषा डांगे किंवा प्रा. संतोष कोळेकर हे संभाव्य उमेदवार असतील.

हेही वाचा – Sanjay Gaikwad : मी बंड केलेलं नाही… निवडणूक लढणारच; गायकवाडांकडून भूमिका स्पष्ट

- Advertisement -

हातकणंगले उमेदवारीचा निर्णय सोमवारी

दरम्यान, प्रकाश शेंडगे पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की,  प्रकाश आंबेडकरांसोबत चर्चा सुरू आहे. त्यांनी आम्हाला सांगलीतील जागेवर समर्थन दिलं आहे. मी स्वत: जर निवडणूक लढवली तर प्रकाश आंबेडकर सांगलीतील जागेवर पाठिंबा देणार आहेत. तर प्रकाश आंबेडकर अकोल्यातून निवडणूक लढवत आहेत, त्यामुळे तिथे आम्ही त्यांना पाठिंबा दिला आहे. याशिवाय आम्ही कोल्हापूर आणि हातकणंगले संदर्भात भूमिका घेतली आहे. कोल्हापूरच्या जागेवर शाहू महाराजांना आम्ही पाठिंबा देतो आहोत. तसेच मराठवाड्यातून नांदेड लोकसभा मतदारसंघात ॲड. अविनाश भोशीकर यांना उमेदवारी देत आहोत. त्याठिकाणी 70 टक्के इथे ओबीसी मतदार आहेत. परभणीतून हरीभाऊ शेळके यांना उमेदवारी देत आहोत, जे धनगर नेते आहेत. तसेच सोमवारी आम्ही हातकणंगले संदर्भात उमेदवारीचा निर्णय जाहीर करू, असं प्रकाश शेंडगे यांनी यावेळी स्पष्ट केलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -