घरठाणे"शरद पवारांना ऑफर देणे हा बालिशपणा", जितेंद्र आव्हाडांची बोचरी टीका

“शरद पवारांना ऑफर देणे हा बालिशपणा”, जितेंद्र आव्हाडांची बोचरी टीका

Subscribe

मुंबई : “ज्या माणसाने अनेकांना ऑफर्स देऊन त्यांची आयुष्य घडवली. शरद पवारांना तुम्ही ऑफर देणे हा बालिशपणा आहे”, अशी बोचरी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भाजप आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केली आहे. गेल्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांची पुण्यातील उद्योगपती चोरडिया यांच्या निवासस्थानी भेट झाली. या भेटीदरम्यान अजित पवार यांनी शरद पवारांना ऑफर दिल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.

शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीदरम्यान ऑफर दिल्याच्या चर्चेवर जितेंद्र आव्हाड म्हणाले, “शरद पवारांना ऑफर देणे हा या दशकातील सर्वात मोठा विनोद आहे. ज्या माणसाने ऑफर्स देऊन लोकांचे आयुष्य घडविले. शरद पवारांना तुम्ही ऑफर देणे हा बालिशपणा आहे. कोणी मला भेटायला आले, तर समोर आलेल्या माणुसकीच्या नात्याने आपण त्यांना भेटतो. कोणी कोणाला भेट नाकारते का?, आपल्याकडे अतिथी देवो भव: अशी संस्कृती आहे.”

- Advertisement -

हेही वाचा – मराठवाड्यातील कार्यकर्त्यांची थोरल्या पवारांना साथ, आमदारांनी धरला अजितदादांचा हात

83 वर्षांचा माणूस युद्ध करायला निघालाय

जितेंद्र आव्हाड म्हणाले, “83 वर्षांचा माणूस युद्ध करायला निघाला असून युद्ध करण्याचे वय नसते. ज्यांना तलवार चालवता येते, तोच युद्ध करतो. मग तो 16 वर्षांचा मुलगा असो किंवा 100 वर्षांचा तरुण असो. तुमच्या मनात युद्ध करण्याची जिद्द लागते.”

- Advertisement -

हेही वाचा – मी पवारांसोबतच हे वारंवार सांगण्याची गरज वाटत नाही – जयंत पाटील

शरद पवारांच्या बीडच्या सभेकडे सर्वांचे लक्ष

शरद पवार हे आज बीड दौऱ्यावर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर मराठवाड्यातील शरद पवारांची पहिली जाहीर सभा आहे. शरद पवार यांचे बीडमध्ये जंगी स्वागत करण्यात येणार असून बीडच्या महालक्षमी चौकातून रॅली काढणार आहे. आजच्या बीडच्या सभेत शरद पवार काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -