घरताज्या घडामोडीउपराष्ट्रपतीपदासाठी विरोधकांकडून मार्गारेट अल्वांना उमेदवारी

उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधकांकडून मार्गारेट अल्वांना उमेदवारी

Subscribe

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी विरोधकांकडून मार्गारेट अल्वा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मार्गारेट अल्वा यांच्या उमेदवारीची घोषणा केली. दिल्लीतील शरद पवारांच्या निवासस्थानी विरोधकांची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती.

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी विरोधकांकडून मार्गारेट अल्वा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मार्गारेट अल्वा यांच्या उमेदवारीची घोषणा केली. दिल्लीतील शरद पवारांच्या निवासस्थानी विरोधकांची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. काही तासाभरापासून ही बैठक सुरू होती. या बैठकीनंतर शरद पवारांनी मार्गारेट अल्वांना उमेदवारी दिल्याची घोषणा केली. (Opposition nominated Margaret Alva for the post of Vice President)

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीकरीता मार्गारेट अल्वा यांच्या उमेदवारी अर्ज मंगळवारी भरणार असल्याची घोषणाही यावेळी शरद पवार यांनी केली. दरम्यान, यावेळी सर्व विरोध पक्षांचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. दिल्लीतील शरद पवारांच्या घरी बैठक झाली. या बैठकीत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यासह कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते मल्लिकार्जून खर्गे यांच्यासह अनेक नेतेमंडळी उपस्थित होती.

- Advertisement -

दरम्यान, विरोधकांकडून उपराष्ट्रपती पदासाठीच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यापूर्वी एनडीएनेही आपल्या उमेदवाराची घोषणा केली होती. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी पत्रकार परिषद घेऊन जगदीप धनखड यांच्या नावाची घोषणा केली. जगदीप धनखड याअगोदर पश्चिम बंगालचे राज्यपाल होते. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी जगदीप धनखड यांच्याशी संघर्ष होत राहिला आहे.

सध्याचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ १० ऑगस्टला संपणार आहे. यामुळे उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी ६ ऑगस्टला मतदान होऊन निकाल जाहीर होणार आहे.

- Advertisement -

शिवसेनेचा अल्वांना पाठींबा

विरोधकांकडून उपराष्ट्रपती पदासाठी मार्गारेट अल्वांना उमेदवारी दिली असूनस शिवसेनेने या निवडणुकीत अल्वांना पाठींबा देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने सत्ताधारी पक्षाला म्हणजेच एनडीएला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.


हेही वाचा – सोमवारपासून ‘या’ वस्तूंच्या किमतीत होणार वाढ; सर्वसामान्यांना बसणार आर्थिक फटका

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -