घरमहाराष्ट्र'राजकारणी अनेक ठिकाणी डोळे मारत असतात'; अमृता फडणवीसांचा अजित पवारांना टोला

‘राजकारणी अनेक ठिकाणी डोळे मारत असतात’; अमृता फडणवीसांचा अजित पवारांना टोला

Subscribe

राजकारणी लोक अनेक ठिकाणी डोळे मारत असतात. अजित पवारांना उद्देशून अमृता फडणवीसांनी हा टोला लगावला आहे. अजित पवार आणि फडणवीस यांची जवळीक आहे की नाही, हे त्या दोघांनाच माहिती, असंही अमृता फडणवीस यावेळी म्हणाल्या.

राजकारणी लोक अनेक ठिकाणी डोळे मारत असतात. अजित पवारांना उद्देशून अमृता फडणवीसांनी हा टोला लगावला आहे. अजित पवार आणि फडणवीस यांची जवळीक आहे की नाही, हे त्या दोघांनाच माहिती, असंही अमृता फडणवीस यावेळी म्हणाल्या. प्रसारमाध्यमांशी बोलत असताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.( Politicians wink at many places Amruta Fadnavis taunts Ajit Pawar )

मागच्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार असल्याच्या चर्चा होत्या. राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसचे  नेते अजित पवार हे भाजपात जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. परंतु माध्यमांसमोर येत अजित पवार यांनी या सर्व चर्चांवर ब्रेक लावला. जीवात जीव असेलपर्यंत मी राष्ट्रवादीत असं म्हणतं अजित पवार यांनी या सर्व वावड्यांवर पूर्णविराम लावला. परंतु त्यानंतरही राष्ट्रवादीच्या अनेक कार्यक्रमांना अजित पवार यांनी लावलेली अनुपस्थिती तसंचं, प्रसिद्धी पत्रकात त्यांचं नाव नसणं, त्यानंतर कर्नाटकमधील राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारकांमध्येही त्यांच नाव वगळण्यात आलं. यावरुन राष्ट्रवादीत धुसफूस कायम असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे आता हा पूर्णविराम आहे की अल्पविराम यावरुनही आता चर्चांना उधाण आलं आहे. त्यातच आता अमृता फडणवीस यांनी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात जवळीक आहे की नाही, हे त्यांनाच माहिती असं म्हटलं आहे.

- Advertisement -

राज्यात बरचं काही घडतं असतं

अमृता फडणवीस म्हणाल्या की, महाराष्ट्र हे असं राज्य आहे ज्या राज्यात अनेक गोष्टी घडत असतात. त्यामुळे राज्याच्या राजकारणात काय होईल, हे सांगता येत नाही. राज्याच्या प्रगतीसाठी आणि जनतेने ज्यांना निवडून दिलं आहे, अशाच लोकांनी राज्याच्या राजकारणात असावं, असं मतही अमृता फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केलं.

( हेही वाचा: दगड मारुन सभा बंद करणारे आम्ही राऊतांनी नादाला लागू नये; गुलाबराव पाटलांचा इशारा )

- Advertisement -

अजित पवारांनी ठाकरे बोलताना मारला होता डोळा 

अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान उद्धव ठाकरे माध्यमांशी बोलत होते, त्यावेळी अजित पवारांनी डोळा मारला होता. तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अजित पवारांनी सारवासारव केली होती. अमृता फडणवीसांनी नेमका मुद्दा हेरत राजकारणी अनेक ठिकाणी डोळे मारत असतात, असं विधान केलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -