घरमहाराष्ट्रपुणेराऊतांच्या अडचणीत वाढ? 'या' प्रकरणात सुजित पाटकरांसह चौघांवर गुन्हा दाखल

राऊतांच्या अडचणीत वाढ? ‘या’ प्रकरणात सुजित पाटकरांसह चौघांवर गुन्हा दाखल

Subscribe

सुजित पाटकर यांच्यावर पुण्यातील शिवाजी नगर पोलीस ठाण्यात नवीन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये फसवणूक करण्याच्या उद्देशाने कागदपत्रांमध्ये फेरफार करणे आणि बनावट कागदपत्रे तयार करण्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांचे साथीदार सुजित पाटकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंटच्या प्रकरणात आधीच त्यांची चौकशी होत असताना आता सुजित पाटकर यांच्यावर पुण्यातील शिवाजी नगर पोलीस ठाण्यात नवीन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये फसवणूक करण्याच्या उद्देशाने कागदपत्रांमध्ये फेरफार करणे आणि बनावट कागदपत्रे तयार करण्याचा आरोप त्यांच्यावर आहे. भाजप नेते किरीट सोमय्या आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने या संदर्भात पोलिसांकडे तक्रार केली होती. (Maharashtra Pune Sanjay Raut business Partner Sujit Patkar FIR Pune Jumbo Covid Centre )

या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू केली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. सोमय्या म्हणाले की, सुजित पाटकर यांनी बनावट कागदपत्रे सादर करून शिवाजी नगर पुणे जंबो कोविड सेंटरचे कंत्राट मिळवले होते. यानंतर आरोपींच्या लाईफ लाईन मॅनेजमेंट सर्व्हिसच्या निष्काळजीपणामुळे तीन रुग्णांचा मृत्यू झाला होता. तर अनेक रुग्णांचे तेथे नुकसान झाले होते.

- Advertisement -

सोमय्यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर एफआयआरची प्रत अपलोड म्हटले की, सुजित पाटकर यांच्याशिवाय त्यांचे साथीदार डॉ. हेमंत गुप्ता, संजय शहा, राजू साळुंखे यांनाही या प्रकरणात आरोपी करण्यात आले आहे. या सर्वांविरुद्ध पोलिसांनी बुधवारी रात्री गुन्हा दाखल केला आहे. अशाच आणखी एका प्रकरणात, आझाद मैदान पोलीस ठाण्यात गेल्या वर्षी देखील गुन्हा दाखल करण्यात आला होता.

किरीट सोमय्या यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आरोप केला होता की, संजय राऊत यांचे व्यावसायिक भागीदार सुजित पाटकर यांनी 100 कोटी रुपयांचा कोविड सेंटर घोटाळा केला होता. या प्रकरणी सुजित पाटकर आणि त्यांच्या लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट कंपनीला आरोपी बनवून गुन्हा दाखल करण्यात आला होता.

- Advertisement -

( हेही वाचा: भाजपने काही पोपट पाळलेत.., संजय राऊतांनी उडवली राज ठाकरेंची खिल्ली )

लोक आपला जीव वाचवण्यासाठी मरत होते, त्या काळात संजय राऊत यांचे बिझनेस पार्टनर सुजित पाटकर लोकांच्या जीवाशी खेळत होते. सुजित पाटकर यांनी वरळी, दहिसर, महालक्ष्मी रेसकोर्स, मुलुंड आणि पुणे येथे बांधण्यात आलेल्या जम्बो कोविड सेंटरचे कंत्राट फसवणूक करून मिळवल्याचे सांगितले. त्याचवेळी, या केंद्रांद्वारे त्यांनी सरकारची 100 कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याचे सोमय्या म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -