घरमहाराष्ट्रहे सरकार चाळीस महाभागांचे; रोहित पवारांचा टोला

हे सरकार चाळीस महाभागांचे; रोहित पवारांचा टोला

Subscribe

ना ग्रामीण भागाचे.. ना शहरी भागाचे… हे सरकार फक्त चाळीस ‘महाभागांचे’! सामान्य लोकं वाऱ्यावर ‘सामान्यांचं सरकार’ तोऱ्यावर, असे ट्वीट करून आमदार रोहित पवार यांनी सरकारवर टीका केली आहे.

 

मुंबईः हे सरकार फक्त चाळीस महाभागांचे आहे, असा टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी शिंदे- फडणवीस सरकारला हाणला आहे. अमरावती येथे शेतकऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यावरून आमदार रोहित पवार यांनी ट्वीट करून शिंदे सरकारवर निशाणा साधला.

- Advertisement -

ना ग्रामीण भागाचे.. ना शहरी भागाचे… हे सरकार फक्त चाळीस ‘महाभागांचे’! सामान्य लोकं वाऱ्यावर ‘सामान्यांचं सरकार’ तोऱ्यावर, असे ट्वीट करून आमदार रोहित पवार यांनी सरकारवर टीका केली आहे.

अमरावती येथे शेतकऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्च केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वृत्त वाहिन्यांवर याचे वृत्तही झळकले. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर येथे हरभरा खरेदीच्या नोंदणीसाठी शेतकरी आले होते. हजारो शेतकऱ्यांची येथे नोंदणीसाठी झुंबड उडाली होती. मात्र ही प्रक्रिया सुरु झाल्याची कोणतीच घोषणा सरकारने केली नव्हती. परिणामी तेथे एकच गोंधळ उडाला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने पोलीसही तेथे दाखल झाले. पोलिसांनी शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला. त्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला. वृत्त वाहिन्यांनी हे वृत्त दाखवले. या घटनेचा निषेध करत आमदार रोहित पवार यांनी ट्वीट करून सरकारवर निशाणा साधला.

- Advertisement -

दरम्यान, गेल्या आठवड्यात आमदार रोहित पवार यांनी शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटली यांना खडेबोल सुनावले होते. एकनाथ शिंदे यांच्यासारखा मराठा चेहारा आपल्यापासून लांब जाता कामा नये. आपण त्यांना बोलावले पाहिजे, असे मी उद्धव ठाकरे यांना बोललो होतो. पण माझे ऐकले नाही. म्हणून आम्ही उठाव केला आणि मराठा चेहऱ्यामागे उभे राहिलो, मराठा चेहऱ्याला मुख्यमंत्री करण्यासाठी आम्ही गद्दारी केली, अशी कबुली शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांनी जळगाव येथील कार्यक्रमात दिली. त्यावरून आमदार रोहित पवार यांनी गुलाबराव पटील यांना टोला लगावल. एकनाथ शिंदे हे केवळ मराठा समाजाचे मुख्यमंत्री आहेत का?, असा सवाल करत आमदार रोहित पवार म्हणाले, ज्या वेळी अनेक गोष्टी हाताबाहेर जातात, तेव्हा अशी वक्तव्ये केली जातात. अशी वक्तव्ये करणे चुकीचे आहे.

हेही वाचाः राज्यपालांच्या अभिभाषणावरून वादाची नांदी; रोहित पवार म्हणतात….

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -