आनंद दवेंच्या सुरक्षेची काळजी घ्या, संजय राऊत यांचे पोलिसांना आवाहन

Sanjay Rauts big statement on tweet on government dismissal says I will not says mva government dismiss

मुंबई : भाजपाच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी केलेल्या वादग्रस्त विधनानंतर देशातील अनेक भागात त्याचे पडसाद उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर पुण्यातील ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांना केंद्रीय तपास यंत्रणेकडून सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. त्यावरून आनंद दवे यांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी, असे आवाहन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुणे पोलिसांना केले आहे.

नुपूर शर्मा यांनी काही दिवसांपूर्वी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. त्यावरून केवळ भारतातच नव्हे तर, अनेक मुस्लीम राष्ट्रांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. तसेच तिच्या समर्थनात सोशल मीडियावर पोस्ट केल्याबद्दल उदयपूर येथे दोन तरुणांनी कन्हैयालाल नावाच्या एका टेलरची निर्घृण हत्या केली होती. तर महाराष्ट्रात अमरावतीमधील औषधविक्रेता उमेश कोल्हे यांची चाकूने भोसकून हत्या केली. आत्ता केंद्रीय तपास यंत्रणेने दवे यांना सतर्क राहण्याच सल्ला दिला आहे.

ब्राह्मण महासंघाचे नेते, कडवट हिंदुत्ववादी कार्यकर्ते आनंद दवे यांच्या जीवितास धोका असल्याचे केंद्रीय तपास यंत्रणानी महाराष्ट्र पोलिसांना कळवले आहे. उदयपूरप्रमाणे काही पुण्यात घडू नये यासाठी पुणे पोलिसानी आनंद दवे यांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – चिपळूणजवळ परशुराम घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प