घरमहाराष्ट्रLok Sabha 2024 : अमरावतीतील वाद मिटणार? राणा दाम्पत्याच्या भेटीबद्दल अडसूळ म्हणतात...

Lok Sabha 2024 : अमरावतीतील वाद मिटणार? राणा दाम्पत्याच्या भेटीबद्दल अडसूळ म्हणतात…

Subscribe

गेल्या 10 वर्षांपासून अमरावतीच्या राजकारणात सुरू असलेला अडसूळ वि. राणा वादा आता क्षमण्याची शक्यता आहे. कारण राम नवमीच्या दिवशी राणा दाम्पत्य हे अभिजीत अडसूळ यांची भेट घेण्यासाठी आणि त्यांची मनधरणी करण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचल्याचे पाहायला मिळत आहेत.

अमरावती : गेल्या 10 वर्षांपासून अमरावतीच्या राजकारणात राणा वि. अडसूळ हा वाद सुरूच आहे. 2024 च्या लोकसभेसाठी महायुतीतर्फे भाजपाकडून खासदार नवनीत राणा यांना उमेदवारी देण्यात आल्यानंतर याबाबत माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि त्यांचे पुत्र अभिजीत अडसूळ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. परंतु, राम नवमीच्या निमित्ताने राणा दाम्पत्याने शिवसेना शिंदे गटाचे नेते अभिजीत अडसूळ यांची भेट घेतली. त्यामुळे गेल्या 10 वर्षांपासून सुरू असलेला हा वाद आता क्षमला आहे का? असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे. पण या भेटीबाबत अभिजीत अडसूळ यांनी आपले मत व्यक्त करत सूचक विधान केले आहे. (Lok Sabha Election 2024 Navneet Rana and Ravi Rana meet Abhijit Adsul)

खासदार नवनीत राणा यांना भाजपाकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शिवसेना नेते, माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. राजकारण सोडेल, पण राणांचा प्रचार करणार नाही, अशी ठाम भूमिका अडसुळांकडून घेण्यात आली. अशीच काहीशी भूमिका त्यांचा मुलगा माजी आमदार अभिजीत अडसूळ यांनी देखील घेतली होती. इतकेच काय तर आज बुधवारी (ता. 17 एप्रिल) सकाळी देखील आनंदराव अडसूळ यांनी बीड येथे एका वृत्तवाहिनीशी संवाद साधत राणा यांना खडेबोल सुनावले. पण त्याच्या काही तासांमध्ये खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा हे कॅप्टन अभिजीत अडसूळ यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचल्या. त्यामुळे राणा आणि अडसूळ या दोघांमध्ये नेमके काय सुरू आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

- Advertisement -

हेही वाचा… Lok Sabha 2024 : पुरावे मागण्यात काय अर्थ आहे? सचिन सावंतांनी निवडणूक आयोगाला सुनावले

सकाळी माजी खासदार आनंदराव अडसूळ यांची खासदार नवनीत राणा यांच्यावर टीका आणि त्याच्या तासाभरात त्यांच्या मुलाच्या म्हणजेत अभिजीत अडसुळांच्या भेटीला पोहोचलेले राणा दाम्पत्य यामुळे अमरावतीच्या राजकारणातील वारे फिरले असल्याचे पाहायला मिळत आहे. पण या भेटीबाबत बोलताना माजी आमदार कॅप्टन अभिजीत अडसूळ म्हणाले की, त्यांना पाठिंबा द्यायचा की नाही, याबाबत आम्ही सकारात्मक चर्चा करू. राजकारणात कोणीही कोणाचा कायमस्वरुपी शत्रु किंवा मित्र नसतो. त्यामुळे राणा दाम्पत्याने आज माझ्याकडे भेटीची इच्छा व्यक्त केली आणि म्हणून मी त्यांना भेटीसाठी वेळ दिला, असेही अभिजीत अडसूळ यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

तसेच, देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनविण्यासाठी लढाई सुरू आहे. 400 पारचा आकडा गाठायचा आहे. देशाचे नेतृत्व नरेंद्र मोदी करत आहेत, त्यांच्यासाठी सर्वजण लढण्यासाठी तयार आहेत. आमचे पदाधिकारी आजही तटस्थ भूमिका घेऊन आहेत. त्यामुळे राणांच्या पाठिंब्याबत नक्कीच सकारात्मक चर्चा करू. तर, प्रचार कोण करते किंवा नाही करत हे महत्त्वाचे नसून भूमिका घेणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे मी पक्षाचा राष्ट्रीय सचिव असल्याने याबाबत योग्य तो निर्णय घेऊ, असे अभिजीत अडसूळ यांच्याकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.

हेही वाचा… Lok Sabha 2024 : खरा रयतेचा प्रतिनिधी शशिकांत शिंदे; उदयनराजे भोसलेंवर जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल

राणा दाम्पत्याने अचानकपणे माजी आमदार अभिजीत अडसूळ यांची भेट घेतल्याने अमरावतीमधील राजकीय वातावरण पुर्णतः बदललेले आहे. तर, काही दिवसांपूर्वीच शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांनी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांचा बंटी-बबली म्हणून उल्लेख केला होता. आजही त्यांनी असाच उल्लेख करत राणा दाम्पत्य अमरावतीच्या राजकारणातील भामटे असल्याचे म्हटले होते. त्यामुळे आता याबाबत आनंदराव अडसूळ नेमका कोणता निर्णय घेतात? यांकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.


Edited By : Poonam Khadtale

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -