घरमहाराष्ट्रLok Sabha 2024 : पुरावे मागण्यात काय अर्थ आहे? सचिन सावंतांनी निवडणूक...

Lok Sabha 2024 : पुरावे मागण्यात काय अर्थ आहे? सचिन सावंतांनी निवडणूक आयोगाला सुनावले

Subscribe

मुख्यमंत्री कार्यालयाने, वर्षा निवासस्थानी राजकीय बैठका झाल्याच नाहीत, असे निवडणूक आयोगाला कळवले आहे आणि निवडणूक आयोग माझ्याचकडे पुरावे मागणार आहे, असे प्रसार माध्यमांमार्फत समजल्याचे सचिन सावंत यांनी म्हटले आहे.

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीवर बारीक लक्ष ठेवून असल्याचे केंद्रीय निवडणूक आयोग सांगत असले तरी राजकीय पक्षांकडून एकमेकांविरोधात तक्रारी केल्या जात आहेत. काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी देखील शासकीय निवासस्थानी बैठका घेतल्या जात असल्याची तक्रार केली आहे. याबाबत त्यांनी ट्वीट देखील केला आहे. (Lok Sabha Election 2024: Sachin Sawant gave evidence of meetings held at Varsha’s residence)

देशभरात एकूण 7 टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणूक होणार असून 4 जून 2024 रोजी मतमोजणी होणार आहे. परिणामी देशभरात आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांकडून सरकारी यंत्रणा आणि पदांचा गैरवापर होत असल्याच्या तक्रारी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे करण्यास विरोधकांनी करण्यास सुरुवात केली आहे. त्याची दखलही निवडणूक आयोग घेत आहे. काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी आचारसंहितेमध्ये राजकीय बैठका झाल्याची तक्रार केली आहे.

- Advertisement -

याबाबतचे ट्वीट सचिन सावंत यांनी केले आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने, अशा बैठका झाल्याच नाहीत असे निवडणूक आयोगाला कळवले आहे आणि निवडणूक आयोग माझ्याचकडे पुरावे मागणार आहे, असे प्रसार माध्यमांमार्फत समजले. तथापि, निवडणूक आयोगाने मला अद्याप याबात काही कळवले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha 2024 : शेतकरी कल्याणाचे दिवे 10 वर्षांत का लागले नाहीत? ठाकरे गटाचा भाजपाला सवाल

मात्र तरीही, सगळ्या माध्यमांमधून वर्षा निवासस्थानी आचारसंहिता लागू झालेली असतानाही झालेल्या बैठकांचे विवरण दैनंदिन स्वरूपात देण्यात आले होते. त्यामुळे खुलेआम सार्वजनिक असलेले पुरावे माझ्याजवळ मागण्यात काय अर्थ आहे? असा सवाल त्यांनी केला आहे. तसेच, यासंदर्भात संबंधितांनी केलेले ट्वीट त्यांनी रीपोस्ट केले आहेत.

मुनगंटीवार यांच्या आरोपांनाही आक्षेप

चंद्रपूरमध्ये झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि चंद्रपूरमधील उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी, 1984मध्ये इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर उसळलेल्या दंगलीवरून त्यांनी कांग्रेसला लक्ष्य केले होते. त्यांनी यासंदर्भात काँग्रेसवर अनेक आरोप केले होते. त्यावर काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी आक्षेप घेत, निवडणूक आयोगाने याची दखल घ्यावी, असे आवाहन केले होते.

हेही वाचा – Lok Sabha 2024 : गेल्या निवडणुकीत अपक्ष निवडून आले, नवनीत राणांनी दाखवला मोदींच्या हवेवर अविश्वास


Edited by – Manoj S. Joshi

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -