Thursday, June 1, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र "आता गद्दार मिशा काढणार का?" संजय राऊत यांची संतोष बांगर यांच्यावर टीका

“आता गद्दार मिशा काढणार का?” संजय राऊत यांची संतोष बांगर यांच्यावर टीका

Subscribe

"मिशा काढल्या आहेत का बघा नाही तर इथून न्हावी पाठवतो. तुमची हजामत करायला." असे निशाणा साधत संजय राऊत यांनी संतोष बांगर यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

राज्यात नुकत्याच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांमध्ये अनेक बाजार समित्यांमध्ये महाविकास आघाडीचा विजय झाला आहे. या विजयाचा जल्लोष महाविकास आघाडीकडून करण्यात येत आहे. तर अशातच आता संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार संतोष बांगर (MLA Santosh bangar) यांच्यावर टीका केली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांच्या प्रचारामध्ये आमदार संतोष बांगर यांनी “17 पैकी 17 जागा निवडून नाही आल्या तर मिशी काढेन” असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा समाचार संजय राऊत यांच्याकडून घेण्यात आला आहे. मिशा काढल्या नसतील तर आम्ही न्हावी पाठवतो, अशी टीका संजय राऊत यांच्याकडून करण्यात आलेली आहे.

हेही वाचा – पुढची मविआची सभा मुंबईत झाल्यास ती मंगल कार्यालयात घ्यावी लागले – नितेश राणे 

- Advertisement -

प्रसार माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, “कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे निकाल हे सरकार आणि भाजपच्या विरोधातील आहेत. काही विशिष्ट भाग वगळला तर सर्वत्र शिवसेनेसह महाविकास आघाडी यांना मोठ्या प्रमाणात यश मिळाले आहे. ज्या मतदार संघात शेतकरी, कष्टकरी मतदान करतो. त्याठिकाणी शिवसेना आजपर्यंत लढली नव्हती. अशा ठिकाणी शिवसेनेचे पॅनेल निवडून आले आहेत.”

“काही गद्दार आमदारांनी घोषणा केल्या होत्या, आम्ही हारलो तर मिशा काढू. आता मिशा काढल्या आहेत का बघा नाही तर इथून न्हावी पाठवतो. तुमची हजामत करायला.” असे निशाणा साधत संजय राऊत यांनी संतोष बांगर यांच्यावर जोरदार टीका केली आहे.ॉ

- Advertisement -

काय बोलले होते संतोष बांगर?
कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या रिंगणात राजकीय नेते, आमदार-खासदार सुद्दा सहभागी झाले होते. यावेळी कळमनुरी बाजार समितीच्या निवडणुकीत संतोष बांगर यांचे पॅनल देखील होते. त्यांच्या पॅनलच्या प्रचारावेळी बांगर यांनी “१७ पैकी १७ जागा निवडून आल्या नाहीत तर मिशी काढेन,” असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर मोठ्या संख्येने व्हायरल होत आहे.

त्यांच्या या वक्तव्यावर आता जोरदार टीका करण्यात येत आहे. ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी अयोध्या पोळ यांनी देखील बांगर यांना त्यांच्या या वक्तव्याची आठवण करून देत त्यांना वस्तरा भेट म्हणून पाठवल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisment -