घरताज्या घडामोडीपाटणकरांवर खोट्या माहितीच्या आधारे कारवाई ; खासदार संजय राऊतांचा घणाघात

पाटणकरांवर खोट्या माहितीच्या आधारे कारवाई ; खासदार संजय राऊतांचा घणाघात

Subscribe

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या मालमत्तांवर ईडीने कारवाई केल्यामुळे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. श्रीधर पाटणकरांवर खोट्या माहितीच्या आधारे कारवाई करण्यात आली, असा घणाघात खासदार संजय राऊतांनी केला आहे. तसेच त्यांनी त्या कारवाई मागचं सत्य काही तज्ज्ञ मंडळींनी समजून घ्यावं, असं देखील राऊत म्हणाले.

पाटणकरांवर खोट्या माहितीच्या आधारे कारवाई

संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, काल श्रीधर पाटणकरांवर कारवाई करण्यात आली असून त्या कारवाई मागचं सत्य काही तज्ज्ञ मंडळींनी समजून घ्यावं. हे नीट समजून घेऊन चुकीच्या माहितीवर आधारीत काही गोष्टी प्रसारीत केल्या जात आहेत. मात्र, त्या गोष्टी हळूहळू बाहेर येतील, मला पूर्णपणे खात्री आहे की, ही बदनामीची मोहीम आमच्या विरूद्ध असून ती उद्या त्यांच्यांवरच उलटल्याशिवाय राहणार नाही. मी पूर्ण विश्वासाने आणि आत्मविश्वासाने सांगतो हे तुमच्यावर उलटणार आहे, असा इशारा राऊतांनी दिला आहे.

- Advertisement -

महाराष्ट्रात ईडीने दोन-चार ठिकाणी कारवाया केल्या म्हणून राजकारण तापल्यसारखं वाटत नाही. दिल्लीत ईडीचं हेड क्वॉर्टर आहे. पण पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रात भाजप विरोधी सरकार आल्याने ईडीचं हेड क्वॉर्टर महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये आलं आहे. भाजपला ज्याने सत्तेपासून दूर ठेवलं. त्यांना या ना त्या कारणाने त्रास दिला जातोय. त्यांच्या कुटुंबाना त्रास दिला जातोय. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीतील मंत्री आणि नेत्यांवरती ईडीच्या आणि आयकर विभागाच्या कारवाया सुरू आहेत, असं राऊत म्हणाले.

भारतीय जनता पक्षामध्ये असं कुणीचं नाही का?, आम्ही सर्व पुरावे दिले आहेत. पंतप्रधानांच्या कार्यालयात आणि ईडीकडे आम्ही सर्व पुरावे दिले आहेत. पंतप्रधान कार्यालयातून मला पोचपावती मिळाली आहे. मात्र, आमच्या पुराव्यांकडे कुणाचं लक्ष नाहीये. केवळ सिलेक्टेड कारवाई सुरू असल्याचं राऊतांनी सांगितलं.

- Advertisement -

किरीट सोमय्यांवर राऊतांची टीका

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावरही राऊतांनी टीका केली. हवाला किंग चतुर्वेदी यांचा ठाकरे सरकारशी संबंध आहे, असा सवाल पत्रकाराने विचारला असता राऊत म्हणाले की, सोमय्यांच्या बोलण्याला कोणीही काहीही विचारत नाही. कारण ते काहीही बोलतात. त्यांच्या बोलण्याकडे लक्ष द्यायची गरज नाही. या हवाला किंगचे भाजपचे संबंध किती आहेत. त्याचे पुरावे प्रधानमंत्री कार्यालयात दिले आहेत. तसेच त्या पुराव्याबाबत मला पोचपावती आली आहे. सोमय्यांनी ज्या नेत्यांविरोधात ईडीकडे कारवाईची मागणी केली. ते भाजपमध्ये गेले. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा?, असा सवाल राऊतांनी उपस्थित केला.


हेही वाचा : NAINA Project : नैना प्रकल्पबाधित शेतकऱ्यांकडून वसुल करण्यात येणाऱ्या सुधारणा शुल्कांना स्थगिती, एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -