मुख्यमंत्र्यांच्या सभेतून राज्यातील गढूळपणा दूर होईल, संजय राऊतांचा विरोधकांवर निशाणा

Sanjay Raut targets the opposition cm uddhav thackeray slams bjp mns rana in rally
मुख्यमंत्र्यांच्या सभेतून राज्यातील गढूळपणा दूर होईल, संजय राऊतांचा विरोधकांवर निशाणा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेतून राज्यातील गढूळपणा दूर होईल असा विश्वास शिवसेना माजी खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. तसेच शिवसेनेची ही मास्टर ब्लास्टर डोस सभा असून विरोधकांना मुख्यमंत्री उत्तर देतील असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आजची सभा ही क्रांतीकारी होणार आहे. विरोधकांना या सभेतून करारा जवाब मिळणार आहे. मोठ्या कालवधीनंतर मुख्यमंत्री पहिल्यांदाच जाहीर सभेतून भाषण करणार आहेत. महाराष्ट्रातील शिवसैनिकांना मुख्यमंत्र्यांचे भाषण ऐकायचे होते ते आजच्या भाषणातून शिवसेनाचा विचार ऐकतील असे संजय राऊत म्हणाले आहेत.

शिवसेना माजी खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेबद्दल भाष्य केलं आहे. राऊत म्हणाले की, मुख्यमंत्री प्रथमच व्यासपीठावर येतील. जर हे व्यासपीठ पाहिले तर महाराष्ट्रातील सभांमध्ये एवढं भव्य व्यासपीठ पहिल्यांदाच करण्यात आले आहे. शिवसेनेचा कारभार भव्य असतो. आज मैदानात उतरण्याच्या निश्चयाने आणि जिद्दीने या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून लाखो शिवसैनिक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणाची वाट पाहत होते. गेल्या दोन एक वर्षात उद्धव ठाकरेंनी व्हिसीद्वारे संवाद साधला आहे. बैठका घेतल्या आहेत.

परंतु विराट जाहीर सभा मोठ्या काळानंतर होत आहे. महाराष्ट्रातील राजकीय वातवारण आणि वातवारणात आलेलं मळभ, गढूळपणा हे आजच्या सभेनं खासकरुन उद्धव ठाकरेंच्या भाषणामुळे दूर होईल. महाराष्ट्रातील आकाश निरभ्र होईल आणि इथे फक्त भगव्या रंगाचा धनुष्य आकाशात विहारताना दिसेल. राज्य आणि पक्ष हा शिवछत्रपतींच्या विचाराने आणि बाळासाहेब ठाकरेंच्या प्रेरणेने सुरु आहे. अनेकजण राज्य बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेक प्रश्न आणि अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. ही जी पोटदुखी आहे. ही जी जळजळ आहे. त्याच्यावर योग्य उपचार आजच्या सभेमध्ये होईल.

दरम्यान ही सभा विरोधकांना बूस्टर डोस असणार का? अशा प्रश्नावर राऊत म्हणाले की, कोणाचा बूस्टर डोस आम्हाला माहिती नाही परंतु हा मास्टर ब्लास्टर डोस आमचा असेल. आमची फटकेबाजी असते. आम्ही मास्टर ब्लास्टर असतो.

शिवसेना आणि गर्दी याचे नाते आणि समीकरण आहे. आम्हाला गर्दी जमवावी लागत नाही आणि आणावी लागत नाही. बाळासाहेब ठाकरेंचा विचार, हिंदुत्वाचा विचार, मराठी माणसासंदर्भातील विचार, महाराष्ट्र स्वाभिमान आणि विकासाचा विचार याच्यामुळे शिवसेनेचे विचारांचे लोहचुंबक असते. लोकं आपणहून येत असतात. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळेल अशी ही सभा आहे, असे संजय राऊत म्हणाले आहेत.


हेही वाचा ; मुख्यमंत्र्यांमध्ये हिंमत असेल तर अकबरुद्दीनचे दात तोडून दाखवा, नवनीत राणांचे आव्हान