घरमहाराष्ट्रसेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्प पुन्हा राज्यात आणण्यासाठी फडणवीसांनी प्रयत्न करावेत, सत्यजीत ताबेंचे ट्वीट

सेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्प पुन्हा राज्यात आणण्यासाठी फडणवीसांनी प्रयत्न करावेत, सत्यजीत ताबेंचे ट्वीट

Subscribe

मुंबई – महाराष्ट्रात होणारा सेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्प गुजरातमधील अहमदाबादमध्ये हलवण्यात आल्याने भाजपवर विरोधकांकडून टीका होत आहे. या सेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्पातून मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होणार होती. दरम्यान हा प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याने काँग्रेसचे नेते सत्यजीत तांबे यांनी हा प्रकल्प पुन्हा महाराष्ट्रात आणण्याासी प्रयत्न करावेत, अशी मागणी केली आहे. याबाबतचे ट्वीट त्यांनी केले आहे.

ट्वीटमध्ये काय –

- Advertisement -

ट्वीटमध्ये सेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्पातून मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होण्यासह इतर अनेक पूरक उद्योगांना चालना मिळाली असती. दुर्दैवाने ही संधी आपल्या हातून गेली आहे. पण तरीही मा. देवेंद्रजी फडणवीस यांनी हा प्रकल्प पुन्हा महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्न करावेत, एवढीच माफक अपेक्षा आहे, असे सत्यजीत तांबे यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

 काय आहे वेदांता आणि फॉक्सकॉन कंपनी –

वेदांता लिमिटेड ही वेदांता रिसोर्सेस लिमिटेडची उपकंपनी आहे. तेल आणि वायू, जस्त, शिसे, चांदी, तांबे, लोह, पोलाद, अॅल्युमिनिअम, तेल यावर आधारित उत्पादनांचे उत्पादन करते.

फोक्सकॉन ही आयफोन कंपनीची कंत्राटी उत्पादक कंपनी म्हणून प्रसिद्ध आहे. तंत्रज्ञान नवकल्पना, सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर एकत्रीकरण आणि औद्योगिक डिझाइनसाठी एकात्मिक दृष्टिकोन असलेले उत्पादन ही कंपनी तयार करते.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -