नवी मुंबईत मुसळधार पावसामुळे शाळेची बस अडकली

नवी मुंबईत सखल भागात पाणी साचल्याने एक शाळेची बस अडकून पडली आहे. या बसला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

मुंबईसह आजूबाजूच्या शहरांना पावसाचा फटका बसला आहे. अनेकजण रस्त्यांवर आणि रेल्वे फलाटांवर अडकून पडले आहेत. शाळेसाठी निघालेले विद्यार्थीही पावसाच्या पाण्यात अडकले आहेत. नवी मुंबईत पावसाचा जोर वाढला असून उलवे वहाळ येथे गुडघ्याएवढे पाणी साचले आहे. तसेच, नवी मुंबईत सखल भागात पाणी साचल्याने एक शाळेची बस अडकून पडली आहे. या बसला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. (School bus stuck in water in navi mumbai)

हेही वाचा – विक्रोळीत पंचशील नगर येथे घरांवर कोसळली दरड, बचावकार्य सुरू

सोमवार सायंकाळपासून मुंबईत पावसाने तुफान बॅटिंग सुरू केली आहे. ४ जुलै सकाळी आठ वाजल्यापासून ते ५ जुलै सकाळी आठ वाजेपर्यंत मुंबईत ९५.८१ मीमी पाऊस झाला तर, पूर्व उपनगरात ११५.०९ मीमी पाऊस आणि पश्चिम उपनगरात ११६.७३ मीमी पाऊस झाला आहे. तर, आज सायंकाळी ४.१० वाजता भरतीची शक्यता असून रात्री १० वाजून २१ वाजेपर्यंत ही भरती ओसरून ओहोटी लागेल.

हेही वाचा- पुढील चार दिवस मुसळधार पावसाचे; हवामान खात्याकडून इशारा

दरम्यान, या मुसळधार पावसाचा फटका विक्रोळीतील पंचशील नगर येथील रहिवाशांना बसला आहे. येथे सकाळी आठ वाजता दरड कोसळली. दरड कोसळल्याने झाडेही उन्मळून पडली आहे. या दरडीत वित्तहानी झाली असली तरी सुदैवाने जीवितहानी झालेली नाही.

ओडिशाजवळ तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र सोमवारी छत्तीसगडवर स्थिरावले. त्यातच पश्चिम किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रात मुंबई, रायगड, कोल्हापूरसह कोकणात पावसाने थैमान घातलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात जगबुडी नदी तसेच रायगड जिल्ह्यातील सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.. पावसाचा जोर लक्षात घेता एनडीआरएफच्या तुकड्या कोकणात सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांसह चाकरमान्यांनी योग्य ती खरबदारी घेण्याचे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.