ठाकरे गटाच्या आमदारांनाही व्हीप जारी करणार : भरत गोगावले

केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्षाचे आणि आणि निवडणूक चिन्ह बहाल केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाने उद्धव ठाकरे गटाची कोंडी करायला सुरुवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून शिंदे गटाने सोमवारी विधान भवनातील शिवसेना विधिमंडळ पक्षाचे कार्यालय ताब्यात घेतले.

We will not return until the operation is completed,

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्षाचे आणि आणि निवडणूक चिन्ह बहाल केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाने उद्धव ठाकरे गटाची कोंडी करायला सुरुवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून शिंदे गटाने सोमवारी विधान भवनातील शिवसेना विधिमंडळ पक्षाचे कार्यालय ताब्यात घेतले. हे कार्यालय याआधी ठाकरे गटाकडे होते. सत्तांतराच्या दरम्यान हे कार्यालय सील करण्यात आले होते. (Shinde group direct warning to Thackeray group bharat Gogavle will issue whip on 56 MLA)

विधिमंडळ पक्ष कार्यालय ताब्यात घेतल्यानंतर शिंदे गटाचे मुख्य प्रतोद भरत गोगावले यांनी ठाकरे गटाच्या १५ आमदारांना अधिवेशन काळात व्हीप बजावण्यात येणार असून तो पाळला नाहीतर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला.

निवडणूक आयोगाच्या निकालानंतर विधानभवनातील पक्ष कार्यालय आपल्याला मिळावे अशी मागणी शिंदे गटाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे केली होती. ही मागणी मान्य केल्यानंतर लगेच शिंदे गटाने या कार्यालयाचा ताबा घेतला. भरत गोगावले यांच्यासह आमदार सदा सरवणकर, मंगेश कुडाळकर, संजय रायमूलकर आदींनी आज सकाळीच कार्यालयाचा ताबा घेतला.

ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांच्या खुर्चीत बसून गोगावले यांनी सभागृहात ठाकरे गट स्वतंत्र नसून त्यांना आमचाच व्हीप पाळावा लागेल, असे स्पष्ट केले. त्यामुळे २७ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दोन्ही गटात संघर्ष उडण्याची शक्यता आहे. यावेळी गोगावले म्हणाले, आम्ही काही कार्यालय बळकावलेले नाही तर आज आम्ही आमच्याच कार्यालयात प्रवेश केला आहे. खरे शिवसैनिक शिवसेनेच्या कार्यालयात आले आहेत.

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह हे आम्हाला मिळाल्याने आम्हीच मूळ शिवसेना पक्ष असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे आता ठाकरे गटातील १५ आमदारांचे स्वतंत्र अस्तित्व राहिलेले नाही. त्यांनाही आमचा व्हीप मान्य करावा लागेल. अधिवेशनात आम्ही सर्व ५५ आमदारांना व्हीप काढू. तो जर ठाकरे गटाच्या आमदारांनी मान्य केला नाही तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही गोगावले म्हणाले. दरम्यान शिंदे गट लवकरच मंत्रालयासमोर असलेले शिवसेनेचे शिवालय हे पक्ष कार्यालय देखील ताब्यात घेणार असल्याचे कळते.


हेही वाचा – औरंगाबादेतील शिवसेना भवनावरून ठाकरे आणि शिंदे गट आमने-सामने