घरमहाराष्ट्र...आता भीतीपोटी वांती सुरू झाली, शिवसेनेची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका

…आता भीतीपोटी वांती सुरू झाली, शिवसेनेची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका

Subscribe

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार आणि खासदारांसह बंड केल्यानंतर शिवसेना पक्षावर दावा केला आहे. ही कायदेशीर पातळीवर लढली जात आहे. शिवसेना नेत्यांकडून बंडखोर आमदारांवर टीका केली जात होती. पण, एकनाथ शिंदे यांचे नाव घेत टीका करणे टाळले होते. मात्र, सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीनंतर शिवसेना नेतृत्वाचा आत्मविश्वास वाढला आहे. शिवसेनेने मुखपत्र समनातून एकनाथ शिंदे यांच्यावर थेट टीका करण्यात आली आहे.

एकनाथ शिंदे यांना आता मळमळत आहे. गरगरत आहे. क्रांतीच्या वल्गना केल्या व आता भीतीपोटी वांती सुरू झाली. शिंद्यांची प्रकृती बिघडली. त्यांच्या चाळीस समर्थकांसाठी हा शुभशकुन नाही. औटघटकेच्या सरकारसाठी ‘स्ट्रेचर’ व अॅम्ब्युलन्स तयार ठेवायला हवी. शिंद्यांनी लवकर बरे व्हावे, त्यांना बरेच काही पाहायचे आहे. ईश्वर त्यांना ते सर्व पाहण्याचे बळ देवो, अशी टीका सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.

- Advertisement -

सर्वोच्च न्यायालयातील घडामोडींमुळे अनेकांना विविध व्याधींनी ग्रासले –

गेल्या दोन महिन्यांपासून महाराष्ट्राची राजकीय प्रकृती बिघडलीच होती, पण ज्यांच्या फुटीरतेच्या किंवा विश्वासघाताच्या ‘डायरिया’मुळे राज्याची प्रकृती खालावली ते मुख्यमंत्री शिंदेही आजारी पडल्याचे वृत्त अलिबाबा आणि चाळीस चोरांसाठी चिंताजनक आहे. मनुष्यप्राणी व त्याचे शरीर म्हणजे एक यंत्र आहे. त्यात अधूनमधून बिघाड होणारच, पण शिंदे हे किमान २० ते २२ तास न झोपता काम करतात. त्यांच्या कामाचा उत्साह व उरक दांडगा आहे. कोणताही व्हायरस त्यांच्या अवतीभवती फिरत नाही. तरीही मुख्यमंत्री शिंदे आजारी पडावेत हे त्या ‘चाळीस’ जणांसाठी चिंताजनक आहे. शिंदे यांना नक्की कोणता आजार जडला आहे हे त्यांनाच माहीत, पण सर्वोच्च न्यायालयात सध्या ज्या घडामोडी सुरू आहेत त्यामुळे अनेकांना विविध व्याधींनी ग्रासले आहे, असा टोला शिवसेनेने सामना आग्रलेखातून शिंदे गटातील आमदारांना लगावला आहे.

- Advertisement -

उद्धव ठाकरेंच्या राज्यव्यापी दौऱ्यांने माहोल बदलेल –

‘शिवसैनिक, शिवप्रेमी जनता आमच्या मागे ठामपणे उभी आहे. उद्धव ठाकरे यांचा राज्यव्यापी दौरा आता सुरू होईल व राज्याचा माहोल बदलण्याची क्रिया सुरू होईल. त्यानंतरचा उडालेला धुरळा पाहून आजचा आजार जास्तच बळावेल व कितीही जादूटोणा केला तरी शिवसेनेची लाट कोणाला रोखता येणार नाही. पुन्हा ८ ऑगस्टला न्यायालयात सत्य व इमानदारीचाच विजय होईल, असेही सामना अग्रलेखात म्हटले आहे.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -