Wednesday, May 31, 2023
27 C
Mumbai
घर क्रीडा शिवराज राक्षेने 'महाराष्ट्र केसरी' जिंकत दाखवलं की, माघार कायमस्वरुपी नसते - अजित...

शिवराज राक्षेने ‘महाराष्ट्र केसरी’ जिंकत दाखवलं की, माघार कायमस्वरुपी नसते – अजित पवार

Subscribe

'महाराष्ट्र केसरी' किताब विजेता मल्ल शिवराज राक्षे आणि उपविजेता महेंद्र गायकवाड या दोघांचेही विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे.

मुंबई : ‘महाराष्ट्र केसरी’ किताब विजेता मल्ल शिवराज राक्षे आणि उपविजेता महेंद्र गायकवाड या दोघांचेही विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे. दुखापतीमुळे गतवर्षी माघार घ्यावी लागलेल्या शिवराज राक्षेनं यंदा ‘महाराष्ट्र केसरी’ जिंकून, कुठलीही माघार कायमस्वरुपी नसते हे दाखवून दिलं आहे. (Shivraj Raksha victory inMaharashtra Kesarishows that retreat is not permanent says Ajit Pawar)

शिवराजच्या जिद्द, प्रयत्नांचे कौतुक करावं तितकं थोडं आहे. महाराष्ट्राची गौरवशाली कुस्तीपरंपरा पुढे नेण्याचं काम शिवराज आणि महेंद्र या दोघांकडून भविष्यात होईल. महाराष्ट्राला कुस्तीतली राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पदकं जिंकून देण्यासाठी शिवराज राक्षे याचा विजय प्रेरणादायी ठरेल. राज्यातील कुस्तीपटूंच्या, कुस्ती चळवळीच्या मागे भक्कमपणे उभं राहण्याची जबाबदारी राज्य सरकारने पार पाडावी, असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

नांदेडचा शिवराज राक्षे आणि सोलापूरचा महेंद्र गायकवाड यांच्यात झालेल्या लढतीमध्ये शिवराजने एका मिनिटात महेंद्राला चितपट करत ‘महाराष्ट्र केसरी’च्या मानाच्या गदेवर नाव कोरले. शिवराजने माजी विजेत्या हर्षवर्धनला ८-१ असे पराभूत करत अंतिम फेरी गाठली होती. तर महेंद्रने वाशिमच्या सिकंदर शेखचा ६/४ असा पराभव केला होता.

अंतिम फेरीत पोहचलेले दोन्ही मल्ल हे पुण्याच्या एकाच तालमीत तयार झालेले आहेत. वस्ताद काका पवार व गोविंद पवार यांच्या कात्रजमधील आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल तालमीतील हे कुस्तीपटू आहेत.

- Advertisement -

पुण्यातील स्व. मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत 65व्या ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. संस्कृती प्रतिष्ठानचेवतीने संस्थापक अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ब्रिजभूषण सिंह, भाजपा मंत्री चंद्रकांत पाटील, क्रीडामंत्री गिरीश महाजन यांची उपस्थिती होती.


हेही वाचा – नांदेडचा शिवराज राक्षे ठरला 55 वा ‘महाराष्ट्र केसरी’

- Advertisment -