घरताज्या घडामोडीभाजपाची मंडळी जाणीवपूर्वक छत्रपती शिवरायांचा अपमान करताहेत, शिवसेनेचा हल्लाबोल

भाजपाची मंडळी जाणीवपूर्वक छत्रपती शिवरायांचा अपमान करताहेत, शिवसेनेचा हल्लाबोल

Subscribe

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. राज्यातील काही ठिकाणी महाविकास आघाडीच्या काही नेत्यांकडून आंदोलनं केली जात आहेत. कोल्हापूरमध्ये शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्या नेतृत्वात राज्यपालांविरोधात आंदोलन करण्यात आलं. दरम्यान, भाजपाची मंडळी जाणीवपूर्वक छत्रपती शिवरायांचा अपमान करताहेत, असा हल्लाबोल संजय पवार यांनी भाजपवर केला आहे.

आम्ही महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सहन केलेला नाही आणि करणार नाही. छत्रपती शिवराय आमचे आदर्श आहेत, आमचे दैवत आहेत. भाजपाची काही मंडळी जाणीवपूर्वक वारंवार छत्रपती शिवरायांचा अपमान करत आहेत, असं संजय पवार म्हणाले.

- Advertisement -

भविष्यात भगतसिंह कोश्यारी किंवा सुधांशू त्रिवेदी कोल्हापुरात आले, तर कोल्हापूर बंदचं आम्ही स्वागत करू. बाप हा शेवटी बापच असतो. छोटा बाप किंवा मोठा बाप, जुना बाप किंवा नवा बाप ही आमची संकल्पना नाही. त्यांची अशी काही संकल्पना असेल तर माहिती नाही, असंही संजय पवार यांनी म्हणत कोश्यारी यांच्यावर टीका केली.

ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हा महाराष्ट्र घडवला त्यांचा राज्यपालांनी तीन ते चारवेळा एकेरी उल्लेख केला. छत्रपतींना शिवाजी म्हणतात आणि शिवाजी जुने झाले असंही सांगतात. शिवविचार कधी जुना होत नाही. तसेच त्यांची तुलना जगातील कोणत्याही महापुरुषाशी करता येत नाही, असं म्हणत शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांनी राज्यपालांवर निशाणा साधला.

- Advertisement -

हेही वाचा : ‘रसना’ कंपनीचे संस्थापक अरीज खंबाटा यांचे निधन


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -