घरमहाराष्ट्रश्रध्दा वालकर प्रकरणी विशेष पोलीस पथकामार्फत चौकशी करणार; उपमुख्यमंत्री फडणवीसांची विधानसभेत घोषणा

श्रध्दा वालकर प्रकरणी विशेष पोलीस पथकामार्फत चौकशी करणार; उपमुख्यमंत्री फडणवीसांची विधानसभेत घोषणा

Subscribe

नागपूर : श्रध्दा वालकर प्रकरणी विशेष पोलीस पथकाची नियुक्ती करुन चौकशी करणारण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत केली.

श्रध्दा वालकर हीची झालेली निर्घृण हत्या व त्या घटनेचे सामाजिक परिणाम लक्षात घेऊन अशा घटना पुन्हा घडू नये याबाबत कायदा करणार का? अशी विचारणा करीत आमदार अतुल भातखळकर यांनी लक्षवेधी मांडली होती.
या वर बोलताना आमदार अँड आशिष शेलार यांनी या प्रकरणात काही गंभीर विसंगती असल्याने हे प्रकरण संशयास्पद असल्याचे निदर्शनास आणून दिले.

- Advertisement -

श्रध्दा वालकर हीने सदर आरोपी कडून आपल्या मारहाण झाली होती अशी तक्रार पोलीस ठाण्यात केली होती, मग गुन्हा दाखल करुन या प्रकरणाची चौकशी का करण्यात आली नाही? दोन्ही कुटुंबाला बोलावून जे लेखी घेण्यात आले त्याला एक वर्षे उशीर का झाला? त्या कागदावर तारखेत खाडाखोड करण्यात का आली? असे प्रश्न उपस्थितीत केले. मागिल अडिच वर्षाच्या काळात तसेच तत्कालीन सरकारने घेतलेल्या भूमिका या संशयास्पद होत्या त्यामुळे या प्रकरणी कोणता दबाव होता का? अशी शंका येते. त्यामुळे विशेष पोलीस पथकाची नियुक्ती करुन या प्रकरणी चौकशी करा, अशी आग्रही मागणी भाजपा आमदार अँड आशिष शेलार यांनी केली. ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केली.

अतुल भातखळकर यावेळी म्हणाले की, श्रद्धा वालकर प्रकरणांसारख्या अनेक घटना राज्यातून समोर येत आहेत. त्यामुळे लव्ह जिहादला विरोध करणारा एखादा कायदा करण्याचा राज्य सरकार विचार करत आहे का?, असा सवाल भातखळकरांनी उपस्थित केला. तसेच श्रद्धा वालकरनं २०२०मध्ये पोलिसात तक्रार अर्ज दिला होता. पण नंतर तिने तो अर्ज मागे घेतला. मुळात तिच्या वडिलांनी हे जाहीरपणे सांगितलंय की, त्यावेळी पोलिसांवर दबाव होता. आफताबच्या घरच्यांनीही तिच्यावर दबाव आणला होता. त्यामुळे हा अर्ज कदाचित मागे घेतला गेला असेल. पण पोलिसांनी कारवाई केली नाही, यामागे काही राजकीय दबाव होता का?, असाही प्रश्न भातखळकरांनी उपस्थित केला.


राज्यात लवकरच लव्ह जिहादविरोधी कायदा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे संकेत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -