घरमहाराष्ट्रपायी चालणाऱ्या वारकऱ्यांवर दुःखाचा डोंगर, दिंडीत कार घुसल्याने ७ जणांचा मृत्यू

पायी चालणाऱ्या वारकऱ्यांवर दुःखाचा डोंगर, दिंडीत कार घुसल्याने ७ जणांचा मृत्यू

Subscribe

दिंडीत पायी चालणाऱ्या वारकऱ्यांवर दुःखाचा डोंगर कोसळलं आहे. सांगोला तालुक्यातील जुनोनी गावाजवळ दिंडी पोहोचली असताना पायी चालणाऱ्या वारकऱ्यांना भरधाव कारने चिरडलं यामध्ये ७ वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या भीषण अपघातामध्ये ८ जणांचा गंभीर जखम झाली असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान वेळेत जखमींना जवळ असलेल्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

राज्यातील वारकरी पंढरीच्या दिशेने पायी निघाले आहेत. विठुरायाच्या दर्शनासाठी दरवर्षी वारकरी पायी पंढरपूरला जात असतात. यामध्ये अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडतात. कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील जठारवाडी गावातील वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी निघाले होते. परंतु या वारकाऱ्यांवर काळाने घाला घातला. दिंडी सांगोला तालुक्यात जुनोनी गावाजवळ पोहोचली होती. परंतु या दिंडीमध्ये भरधाव कार घुसली आणि ७ जणांचा बळी गेला. तसेच जोरदार धडक कारने दिल्यामुळे ८ वारकरी गंभीर जखमी झाले आहेत तर आणखी वारकरी किरकोळ जखमी झाली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

- Advertisement -

दिंडीत झालेल्या अपघातामध्ये मृत झालेल्यांमध्ये महिला, पुरुष लहान मुलांचा समावेश आहे. यामध्ये पाच महिला, एक पुरुष आणि एक लहान मुलाचा मृत्यू झाला आहे. कारचालकासह गाडीतील आणखी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

दिंडीतील वारकऱ्यांचा अपघातात मृत्यू झाल्यामुळे राज्यात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आङे. तसेच करवीर तालुक्यावर दुःखाची लाट पसरली आहे. अपघाताची माहिती मिळताच सांगोला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली


डायबिटीस असूनही बटाटा खातायं? मग अगोदर वाचा डॉक्टरांचा सल्ला

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -