Thursday, June 1, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र नागपूर Devendra Fadnavis : नागपूर जिल्ह्यावर देवेंद्र फडणवीसांचे विशेष लक्ष, प्रत्येक तालुका पिंजणार

Devendra Fadnavis : नागपूर जिल्ह्यावर देवेंद्र फडणवीसांचे विशेष लक्ष, प्रत्येक तालुका पिंजणार

Subscribe

नागपूर जिल्ह्यामध्ये भाजप पक्षाच्या विरोधात वातावरण निर्मिती होत आहे. अशी माहिती राजकीय जाणकारांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे फडणवीस नागपूर दौऱ्यात तालुका पिंजून काढणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

राज्यातील सत्ता संघर्षावर (Maharashtra political crisis) निर्णय देत सुप्रीम कोर्टाने 16 आमदारांच्या अपात्रतेबाबतचा निर्णय विधानसभा अध्यक्षांवर सोपवला आहे. त्यामुळे आता शिंदे-फडणवीस सरकार बचावले आहे. पण सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे राज्यातील सर्वच राजकीय पक्ष हे आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच त्यामुळे राजकीय पक्षांनी आपल्या नेत्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यास देखील सुरूवात केली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (J. P. Nadda) यांनी सुद्धा बुधवारी आणि गुरुवारी महाराष्ट्राचा दौरा करत पुण्यात भाजपच्या कार्यकारिणीची बैठक घेतली. त्यानंतर आजपासून (ता. 19 मे) देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) हे नागपुरच्या दौऱ्यावर आहेत.

हेही वाचा – राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवरून अजित पवारांनी सरकारला सुनावले

- Advertisement -

देवेंद्र फडणवीस यांचा नागपूर दौरा हा फक्त एत दौरा नाही तर ते या दौऱ्याच्या माध्यमातून संपूर्ण जिल्हा पिंजून काढणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर जिल्ह्यामध्ये भाजप पक्षाच्या विरोधात वातावरण निर्मिती होत आहे. अशी माहिती राजकीय जाणकारांकडून देण्यात आली आहे. त्याचमुळे फडणवीसांनी हा नागपूर दौरा करण्याचे ठरविले असल्याचे सांगण्यात आले आहे.

या दौऱ्यामध्ये आपण शासकीय योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी काम करणार असल्याचे सांगत ते म्हणाले की, दोन दिवसांमध्ये चार मतदारसंघ पूर्ण होतील. इतरही दोन मतदारसंघ त्यानंतर पूर्ण करु. जिल्ह्यातल्या सहाही मतदारसंघात जावून आढावा घेणार असून सगळे तालुके आणि सगळ्या नगर पालिका कव्हर करणार आहे, अशी माहिती त्यांनी फडणवीस यांनी सावनेर येथे झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात दिली.

- Advertisement -

तसेच, ‘सरकारच्या योजना इफेक्टिव्हली सामान्यांपर्यंत पोहोचवता याव्यात यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. फक्त सावनेर आणि काटोलच नाही तर सहाही मतदारसंघात फिरणार असल्याचे यावेळी त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले.

कर्नाटकात भाजपचा दारूण झालेला पराभव हा त्यांच्या जिव्हारी लागला असल्याचे दिसून येत आहे. या पराभवानंतर भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी देशातील सर्वच लोकसभेच्या खासदारांच्या कामाची माहिती मागवून घेतली आहे. त्यामुळे फडणवीस यांनी सुद्धा आगामी लोकसभेच्या आणि भविष्यात होणाऱ्या विधानसभांच्या निवडणुकांमध्ये रिस्क न घेण्याचा विचार केला असल्याचेच दिसून येत आहे.

- Advertisment -