घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रयेवल्यात यश मात्र बालेकिल्ला लासलगावात छगन भुजबळांना मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या 'या' नेत्याने...

येवल्यात यश मात्र बालेकिल्ला लासलगावात छगन भुजबळांना मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याने केला पराभव

Subscribe

नाशिक : लासलगावं बाजार समितीमध्ये शेतकरी पॅनलकडून माजी सभापती सुवर्णा जगताप आणि त्यांचे पती ज्ञानेश्वर किशन जगताप हे उमेदवार होते. हे दोघेही निवडून आल्याने त्यांची लासलगाव बाजार समितीच्या संचालकपदी वर्णी लागली आहे.

सर्वात मोठी कांदा बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या लासलगाव बाजार समिती निवडणुकीचा निकाल लागला असून छगन भुजबळ यांना धक्का बसला आहे. या निवडणुकीत छगन भुजबळ आणि जयदत्त होळकर प्रणित शेतकरी विकास पॅनल आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पंढरीनाथ थोरे आणि माजी संचालक डी. के. जगताप यांच्या नेत्तृत्वाखाली शेतकरी पॅनलमध्ये सरळ लढत होती. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये थोरे गटाला 18 पैकी 9 तर माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आणि जयदत्त होळकर यांच्या नेतृत्त्वाखालील पॅनलला 8 तर एक जागेवर अपक्ष उमेदवाराचा विजय झाला आहे.

- Advertisement -

या 18 जागांमध्ये 10 जुने चेहरे पुन्हा विजयी झाले असून बाजार समितीच्या माजी सभापती सुवर्णा जगताप व त्यांचे पती हे दोघेही निवडून आले आहेत. सोसायटी गटातून सुवर्णा ज्ञानेश्वर जगताप या उमेदवारी करत होत्या तर त्यांचे पती ज्ञानेश्वर किशन जगताप हे ग्रामपंचायत गटामधून निवडणूक लढवत होते. शनिवारी लागलेल्या निकालात दोघांनीही विजय मिळवला आहे. यात माजी सभापती सुवर्णा जगताप यांना 412 मते तर डीके जगताप यांना 303 मते मिळाली आहेत.

भुजबळांना धक्का 

खरंतर, लासलगाव ही बाजारपेठ छगन भुजबळ यांच्या येवला विधानसभा मतदार संघात येते. आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ म्हणून ओळख असलेलया आणि राज्यातील एक महत्वपूर्ण बाजार असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत याआधी छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात जयदत्त होळकर यांची अनेक वर्ष सत्ता होती. मात्र, राष्ट्रवादी कॉँग्रेसचेच पंढरीनाथ थोरे यांनी डिके जगताप यांच्या सोबत वेगळ्या पॅनलची निर्मिती केली आणि इतर काही पक्षांचा पाठिंबाही मिळवला. या बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातून 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भुजबळ यांना मोठी आघाडी मिळाली होती. त्यामुळे हा पराभव भुजबळांना मोठा धक्का मानला जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -