घरमहाराष्ट्रपंढरपूरच्या विठुरायाला सोन्याचा साज; भक्तांकडून 19 तोळे चंदनहार अर्पण

पंढरपूरच्या विठुरायाला सोन्याचा साज; भक्तांकडून 19 तोळे चंदनहार अर्पण

Subscribe

अनेक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या पांडुरंगाची ख्याती आहे. पंढरपूरच्या वारीची जगात चर्चा असते. यातील वारकऱ्यांच्या या वैष्णवांच्या मेळ्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील कौतुक केले. यामुळे पंढरपुरच्या पांडुरंगाला अनन्यसाधारण महत्व आहे. देशातील महत्त्वाच्या तिर्थक्षेत्रांमध्ये पंढरपूरचे नाव घेतले जाते. त्यामुळे तिरुपतीचा बालाजी, शिर्डीचे साईबाबांना भाविकांकडून जसे दान मिळते त्याप्रमाणे पंढपूरच्या पांडुरंगा चरणी देखील मनोभावे दान केले जाते. अशात एका भाविकाने 11 लाख रुपये किंमतीचा चंदनहार पंढपूरच्या पांडुरंगा चरणी अपर्ण केला आहे.

पंढपूरात आषाढी अन् कार्तिकी एकादशीला भक्तगण येत असतात. भक्तांचा मोठा मेळा चंद्रभागेच्या तिरी जमा होतो. यंदाही कार्तिकी यात्रेनिमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांसह वारकऱ्यांनी मोठी गर्दी केली आहे. यातच आता पंढरीच्या मंदिरातील खजिन्यात विविध सोने चांदीच्या दागिन्यांची भर पडली आहे. कल्याणमधील विठ्ठल भक्त वंदना म्हात्रे यांनी 11 लाख रुपये किंमतीचे 19 तोळे वजनाचा सोन्याचा चंदनहार विठुरायाच्या चरणी अर्पण केला आहे. अत्यंत सुबक कलाकुसर केलेला हा सोन्याचा चंदन हार आज मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे.

- Advertisement -

कार्तिकी यात्रेनिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या देणगीमध्ये भर पडत आहे. या यात्रेनिमित्त पंढरपुरात येणाऱ्या वारकऱ्यांच्या सोयीसाठी प्रशासन देखील सज्ज झाले आहे. यासाठी पोलिसांकडून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच तिरुपती बालाजी मंदिराच्या धर्तीवर पंढपूरचाही विकास आराखडा तयार करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे.


डिसले गुरुजींवर आरोप करणारे शिक्षणाधिकारी अडचणीत; झेडपीने केली ‘ही’ कारवाई

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -