घरमहाराष्ट्रकोर्टाने सुनावला 25 हजारांचा दंड, आरोपी 250 वर अडून बसला; म्हणाला, गुगल...

कोर्टाने सुनावला 25 हजारांचा दंड, आरोपी 250 वर अडून बसला; म्हणाला, गुगल…

Subscribe

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून विमानप्रवासात गैरवर्तन वाढल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. एअर इंडियाच्या (Air India) लंडन ते मुंबई प्रवासातही एका प्रवाशाने गरैवर्तन केल्याने कोर्टाने त्याला कोठडी सुनावली आहे. जामीनासाठी त्याला कोर्टाने २५ हजार रुपये भरण्याचे निर्देश दिले होते. मात्र, त्याने २५ हजार रुपये भरण्यास नकार दिला असून फक्त २५० रुपये भरण्याची तयारी दर्शवली. त्यामुळे न्यायालायने त्याला कोठडी सुनावली.

हेही वाचा – कायदा हातात घेऊ नका, OROP लागू करा; न्यायालयाने संरक्षण मंत्रालयाला फटकारले

- Advertisement -

१० मार्च रोजी रत्नाकर द्विवेदी लंडन ते मुंबई असा प्रवास एअर इंडियाने करत होता. यावेळी त्याने विमानात धुम्रपान केले, तसंच, गैरवर्तन केल्याचाही आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. त्यामुळे याप्रकरणी मुंबई पोलिसांकडून तक्रार करण्यात आली. त्याच्यावर भारतीय दंड संहिता कलम ३३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हे प्रकरण अंधेरी न्यायदंडाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचल्यानंतर न्यायालयाने त्याला अटकपूर्व जामीन मंजूर केला. तसंच, जामिनासाठी २५ हजार रुपये भरण्यास सांगितले. मात्र, आरोपीने शक्कल लढवत त्याच्यावर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याखालील जामीनावर किती दंड आकरला जातो याची माहिती गुगलवर सर्च केली. तेव्हा त्याला २५० रुपये भरावे लागत असल्याचे गुगलवरून समजले. त्यामुळे त्याने फक्त २५० रुपये भरण्याची तयारी दर्शवली. परंतु, कोर्टाने त्याला कोठडी सुनावली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – 25 वर्ष घरकाम केल्याचा घटस्फोटीत पतीकडून मिळाला मोबदला, स्पेन न्यायालयाचा आदेश

आरोपीने न्यायालयात सांगितलं की, मी यासंदर्भात गुगलवर सर्च केलं आहे. त्यानुसार आयपीसी कलम ३३६ अंतर्गत गुन्ह्यासाठी २५० रुपयांचा दंड आहे. हा २५० रुपयांचा दंड मी भरायला तयार आहे. परंतु, जामिनासाठी २५ हजार रुपये देणार नाही. त्यामुळे अंधेरी दंडाधिकाऱ्यांनी १३ मार्च रोजी त्याला तुरुंगात टाकण्याचे निर्देश दिले. मुंबई पोलिसांनुसार, आरोपीने विमानात काहीतरी गडबड केली होती, ज्यामुळे उपस्थित प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -