घरमहाराष्ट्रआजपासून होणार 'हे' 11 बदल; तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम, जाणून घ्या...

आजपासून होणार ‘हे’ 11 बदल; तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम, जाणून घ्या सविस्तर

Subscribe

1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष 2023-24 ला सुरुवात झाली आहे. या नव्या आर्थिक वर्षात 11 महत्त्वपूर्ण वित्तीय बदल होत आहेत.

1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष 2023-24 ला सुरुवात झाली आहे. या नव्या आर्थिक वर्षात 11 महत्त्वपूर्ण वित्तीय बदल होत आहेत. यात सराफा बाजारात केवळ 6 अंकी हाॅलमार्कचे सोनेच विकले जाणे, तसेच पेनकिलर आणि अॅटीबायोटीक्स औषधी महाग होणे यांचा समावेश आहे.

सोने महागणार

सोने व इमिटेशन ज्वेलरीवरील आयात कर 20 टक्क्यांवरुन 25 टक्के तर चांदीवरील आयात कर 1.5 टक्क्यांवरुन 16 टक्के करण्यात आला आहे. त्यामुळे सोन्यासह सर्व दागिने महाग होणार आहेत.

- Advertisement -

करप्रणालीत बदल

करदात्यांना नवी आयकर व्यवस्था मिळेल. यात कर सवलत 7 लाख रुपये करण्यात आली आहे. आधीती 5 लाख रुपये होती.नोकरदारांना 7.5 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नाावर कर लागणार नाही.

6 अंकी हाॅलमार्क बंधनकारक

सोन्याच्या दागिन्यांवर 6 अंकी हाॅलमार्क बंधनकारक करण्यात आला आहे. त्याशिवाय त्यांना दागिने विकता येणार नाहीत.

- Advertisement -

पंतप्रधान वय वंदन योजना बंद

पंतप्रधान वय वंदन योजना बंद होईल. 60 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या लोकांसाठी ही एकरमकी हप्त्याची पेन्शन योजना होती.

विना पॅन पीएफ काढण्यावरील करात कपात

पॅन क्रमांक जोडलेला नसलेल्या खात्यातून पीएफ काढल्यास 30 टक्के टीडीएस कापला जात होता. 1 एप्रिलपासून 20 टक्केच कपात जाईल.

ज्येष्ठ नागरिक बचत

ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत कमाल 30 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येईल. आधी ही मर्यादा 15 लाख रुपये होती. या योजनेत वार्षिक 8 टक्के व्याज मिळते.

( हेही वाचा: पुण्यातील भावी खासदार ठरले: बापट यांना जाऊन तीन दिवस झाले नाहीत, तोच बॅनरबाजी; राष्ट्रवादीने घेतला समाचार )

औषधी महाग होणार

सरकारने औषधांच्या किमती 10 टक्क्यांपर्यंत वाढवण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे वेदनाशामके व प्रतिजैविक यांसह 300 पेक्षा अधिक औषधी महाग होतील.

महिला सन्मान योजना

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना 1 एप्रिलपासून सुरु होईल. यात महिला 2 वर्षांसाठी 2 लाख रुपये गुंतवू शकतील. त्यावर 7.5 टक्के व्याज मिळेल.

डेट फंडावरील एलटीजीसी सवलत बंद

डेट म्युच्युअल फंडावरील दीर्घकालीन लाभ करातील सवलत आता बंद होणार आहे. त्यामुले त्यावर टॅक्स स्लॅबच्या हिशोबाने कर लागेल.

घरगुती एलपीजी सिलिंडर

प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला पेट्रोलियम पदार्थांच्या किमतीचा आढावा घेतला जातो. 1एप्रिल रोजी गॅसच्या दरात बदल होऊ शकतो.

वाहने महाग होणार

बीएस 6 च्या दुसऱ्या टप्प्यातील उत्सर्जन नियम लागू होतील. त्यामुळे सर्व गाड्या महागतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -