Eco friendly bappa Competition
घर राजकारण पुण्यातील भावी खासदार ठरले: बापट यांना जाऊन तीन दिवस झाले नाहीत, तोच...

पुण्यातील भावी खासदार ठरले: बापट यांना जाऊन तीन दिवस झाले नाहीत, तोच बॅनरबाजी; राष्ट्रवादीने घेतला समाचार

Subscribe

'भावी खासदार जगदीश मुळीक' यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा असे म्हणत, पुण्यात बॅनरबाजी करण्यात आली.

‘भावी खासदार जगदीश मुळीक’ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा असे म्हणत, पुण्यात बॅनरबाजी करण्यात आली. पुण्याचे खासदार गिरीश बापट यांना जाऊन तीनच दिवस झाले असताना, पुण्यातील मुळीक यांच्या कार्यकर्त्यांनी केलेली पोस्टरबाजी चर्चेचा विषय ठरली आहे. मुळीक यांचे बॅनर लागल्याने राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत भाजप पक्षावर निशाणा साधला आहे.

हाच काय तुमचा वेगळेपणा ?

गिरीश बापट यांच्या मागे लगेचच जगदीश मुळीक हे भावी खासदार म्हणत पुण्यात बॅनर लागल्याने,राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत, हाच काय तुमचा वेगळेपणा म्हणत भाजप पक्षाला टोला लगावला आहे.

- Advertisement -

10 दिवसांचे सुतक तर संपुद्या मग लावा बॅनर का तुम्ही वाटच बघत होतात आणि म्हणता आम्ही इतर पक्षापेक्षा वेगळे आहोत. हाच का तुमचा वेगळेपणा? बापट साहेबांच्या घरच्यांचे अश्रू अजून वाहात आहेत. तुम्ही आधीच बॅट पॅड घालून तयार, असे म्हणत आव्हाड यांनी भाजपला टोला लगावला आहे.

( हेही वाचा: मुंबई महापालिकेचे माजी आयुक्त शरद काळे यांचे निधन )

- Advertisement -

भाजपचे खासदार गिरीश बापच यांचे तीन दिवसांपूर्वी पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात निधन झाले. वयाच्या 75 व्या वर्षी गिरीश बापट यांनी अखेरचा श्वास घेतला. बापट हे मागच्या काही महिन्यांपासून आजारी होते. त्यांच्या पार्थिवावर पुण्यातील वैकुंठभूमी स्मशानभूमीत अंत्यसंस्कारही करण्यात आले. यावेळी सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. गिरीश बापट हे पुण्याचे खासदार होते. त्यांच्या अकाली निधनामुळे पुणे लोकसा मतदारसंघाची जागा रिक्त झाली आहे. त्यामुळे आता येत्या सहा महिन्यांत या रिक्त जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुण्यात जगदिश मुळीक यांच्या कार्यकर्त्यांनी भावी खासदार म्हणून जगदीश मुळीक यांचे बॅनर लावले आहेत. त्यामुळे ही बॅनरबाजी राजकीय वर्तुळात सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.

जगदीश मुळीक कोण?

जगदीश मुळीक हे भाजपचे पुणे शहर अध्यक्ष आहेत. माजी आमदार आहेत. त्यांच्या कार्यकर्त्यांनी मुळीक यांच्या नावाने मोठेमोठे बॅनर्स लावले आहेत. त्यावर भावी खासदरा जगदीश मुळीक असे लिहिले आहे. 1 एप्रलि रोजी मुळीक यांचा वाढदिवस असल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी हे बॅनर्स पुणे शहरात लावले आहेत.

 

- Advertisment -