घरमनोरंजनआसामच्या नयनज्योती सैकियाने जिंकला 'मास्टरशेफ इंडिया-7'चा किताब

आसामच्या नयनज्योती सैकियाने जिंकला ‘मास्टरशेफ इंडिया-7’चा किताब

Subscribe

हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय कुकिंग रिअॅलिटी शो ‘मास्टरशेफ इंडिया-7’ मागील अनेक दिवसांपासून चर्चेत होता. नुकतीच या शोच्या विजेत्याची घोषणा करण्यात आली आहे. यंदा आसामच्या नयनज्योती सैकियाने मास्टरशेफ इंडियाचा किताब पटकावला आहे. नयनज्योतीने शोमध्ये त्याच्या उत्कृष्ट स्वयंपाक कौशल्याने आणि त्याच्या साधेपणाने सर्वांची मने जिंकली. अनेक आठवडे कठीण आव्हानांवर मात केल्यानंतर नयनज्योती आता मास्टरशेफ इंडियाची विजेता बनला आहे.

‘मास्टरशेफ इंडिया 7 शो’ 36 स्पर्धकांसह सुरू झाला होता. त्यानंतर टॉप 16 स्पर्धकांची निवड करण्यात आली आणि त्यानंतर टॉप 7 स्पर्धकांमध्ये अंतिम सामना घेण्यात आला. या शोच्या फिनालेमध्ये सांता सर्मा, महाराष्ट्राच्या सुवर्णा बागुल आणि नयनज्योती सैकिया हे टॉप तीन सदस्य होते.

- Advertisement -

या सर्वांवर मात करत होम कुक नयनज्योती सैकिया मास्टरशेफ इंडियाचा विजेता ठरला आहे.  कुकिंग रिअॅलिटी शो जिंकल्यानंतर नयनज्योती सैकियाला एक चमकदार ट्रॉफी आणि 25 लाखांचे बक्षीस मिळाले आहे. तसेच आसामची सांता सर्मा या शोची फर्स्ट रनर अप ठरली आणि मुंबईची सुवर्णा बागुल दुसरी रनर अप ठरली. दोन्ही उपविजेत्या खेळाडूंना 5 लाखांचे बक्षीस देण्यात आले आहे.

या वर्षी मास्टरशेफ इंडियाला शेफ रणवीर ब्रार, विकास खन्ना आणि गरिमा अरोरा यांनी जज केले होते. तसेच या शोच्या ग्रँड फिनालेला मास्टर शेफ संजीव कपूर उपस्थित राहिले होते.

- Advertisement -

 


हेही वाचा :

‘किसी का भाई किसी की जान’मधील ‘बठुकम्मा’ गाणं रिलीज

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -