वीजचोरी प्रकरणात आरोपीविरोधात तिसऱ्यांदा गुन्हा दाखल, न्यायालयाने नाकारला जामीन

वीजचोरी प्रकरणातील आरोपी आझमअली झाकीरअली सय्यदचा जामीन याचिका नुकतीच दिंडोशी सत्र न्यायालयाने फेटाळली. तसेच चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडीही या वीजचोरी प्रकरणात न्यायालयाने सुनावली आहे. वारंवार वीजचोरीचा गुन्हा घडल्यानेच आरोपीचा जामीन न्यायालयाने नाकारला. वीजचोरीचा प्रकार म्हणजे सामाजिक हिताला धोका असून नजीकच्या काळात कायदेशीर यंत्रणांनी हा प्रकार अतिशय गांभीर्याने घेतला आहे.

वीजचोरी प्रकरणात आझमअली झाकीरअली सय्यद विरोधात तिसऱ्यांदा वीजचोरीचा गुन्हा २२ नोव्हेंबर, २०२१ रोजी दाखल करण्यात आला. याच प्रकणात अदाणी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड (एईएमएल) ने जोगेश्वरीच्या मेघवाडी पोलीस स्टेशनमध्ये २४ नोव्हेंबर, २०२१ रोजी एफआयआर दाखल केली. या प्रकरणात २४ जुलै, २०२१ ते २२ नोव्हेंबर, २०२१ दरम्यानच्या कालावधीत ९३ हजार १३४ रूपयांची वीजचोरी सय्यदने केल्याचे आढळले. त्यानंतर २० डिसेंबर, २०२१ रोजी आरोपी आझमअली झाकीरअली सय्यदला विशेष न्यायालयासमोर न्यायमूर्ती एस यु बघेले यांच्यासमोर उपस्थित करण्यात आले.

या प्रकरणातील तपास अधिकाऱ्याने आऱोपीविरोधात कोठडीसाठीचा ताबा मिळवण्यासाठी अर्ज क्रमाक १७/२०२१ न्वये मेघवाडी पोलीस स्टेशनच्या वतीने SPL, LAC 128/2021 विरूद्ध आझमअली झाकीरअली सय्यद विरोधातील प्रकरणात दाखल केला. त्यानंतर न्यायलायाने आऱोपीला या प्रकरणात २२ डिसेंबर, २०२१ पर्यंत पोलीस कोठडीत पाठवले. या प्रकरणात ग्राहकाकडून ९३ हजार रूपये हे २८ डिसेंबर, २०२१ रोजी अदा करण्यात आले.

त्यानंतर ३१ डिसेंबर, २०२१ रोजी न्यायालयाने आरोपीच्या जामीनावर सुनावणी घेत हा जामीन पुन्हा फेटाळला. या प्रकरणात न्यायालयाने एक गोष्ट नोंदवली ती म्हणजे आझमअली झाकीरअली सय्यद (ग्राहक क्रमांक १५१७११७५८) हा गंभीर स्वरूपाचा असा गुन्हेगार आहे. याआधी अदाणी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेडने वीजचोरीच्या प्रकरणात या आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला होता. याआधी २०१३ मध्ये या आरोपीविरोधात वीजबिल अदा न केल्याविरोधात वीज पुरवठा खंडीत करत २६ जून, २०१४ रोजी गुन्हा दाखल केला होता.

या प्रकरणात आरोपीने बेकायदेशीरपणे विजेचा वापर घरगुती कारणासाठी करायला सुरूवात केली होती. त्यासोबतच वाणिज्यिक वापरासाठीही वीजचोरी केल्याचे आढळले होते. या प्रकरणात वीज कायदा २००३ च्या कलम १३५ न्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच वीजचोरीसाठीची एफआय़आर हा १० मार्च, २०१५ मध्ये दाखल करण्यात आली होती. या प्रकरणात १० जुलै, २०१३ ते २६ जून, २०१४ या कालावधीत ७९१८ युनिट म्हणजे १ लाख ४५ हजार ३१५ युनिट विजेचा वापर केल्याचे स्पष्ट झाले होते.

त्यानंतर आऱोपीने नवीन विजेच्या मीटरसाठी २०१७ मध्ये अर्ज केला. नवीन मीटर हा आझम अली सय्यदच्या (ग्राहक क्रमांक १५२४०३५८०) च्या नावे २७ मार्च, २०१७ मध्ये देण्यात आला होता. याआधीच्या वीज जोडणीच्या ग्राहक क्रमाकांच्या १५१७११७५८ च्या आधारे १ लाख ८० हजार रूपयांची थकबाकी नवीन ग्राहक क्रमाक १५२४०३५८० च्या खात्यात समाविष्ट करण्यात आली. पण या वीजदेयकाचा भरणा न झाल्यानेच पुन्हा हा वीजपुरवठा मे, २०१८ मध्ये खंडित करण्यात आला. त्यानंतर वीज ग्राहकाविरोधात २३ जुलै, २०२१ रोजी वीजचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

वीजचोरीसाठी २३ जुलै, २०२० ते २३ जुलै, २०२१ या कालावधीत १५ हजार ३०४ युनिटच्या वीजचोरीत ३ लाख ४ हजार ४६८ रूपयांचा वीजचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच २७ जुलै, २०२१ मध्ये या प्रकरणात एफआयआरही दाखल करण्यात आली. त्या प्रकरणात आरोपीला अटक करण्यात आली. त्यानंतर ८ ते ९ दिवसांची न्यायालयीन कोठडीही सुनावण्यात आली. पण दिंडोशी विशेष न्यायालयाने जामीन दिल्याने आरोपीची सुटका झाली होती.

न्यायालयाने सुनावलेल्या न्यायालयीन कोठडीवर एईएमएल प्रवक्ता म्हणाले, ” आम्ही विशेष सत्र न्यायालयाने दिलेल्या निकालाने अतिशय समाधानी आहोत. न्यायालयाने वीजचोरी प्रकरणात आऱोपीचा नाकारलेला जामीन आदेश समाजात वीजचोरीच्या गुन्ह्याच्या प्रकाराविरोधात एक मोठा संदेश देणारा आदेश आहे. मेघवाडी पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी या प्रकरणात दाखवलेल्या कार्यतत्परतेसाठी आम्ही त्यांचे आभारी आहोत, असेही ते म्हणाले.


हेही वाचा : Indian Army : सॅल्यूट! काश्मीरच्या बर्फवृष्टीतही गर्भवती महिलेला जवानांची मदत, व्हिडिओ व्हायरल