घरमहाराष्ट्रपुणेNarendra Modi : मोदींना टिळक पुरस्कार द्यावा की नाही? कॉंग्रेस नेत्यांमध्येच खडाजंगी

Narendra Modi : मोदींना टिळक पुरस्कार द्यावा की नाही? कॉंग्रेस नेत्यांमध्येच खडाजंगी

Subscribe

 

मुंबईः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार जाहिर झाला असला तरी कॉंग्रेस नेत्यांमध्ये यावरुन चांगलीच जुंपली आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याचा जाहिर विरोध केला आहे तर कॉंग्रेस नेते विश्वजीत कदम यांनी याचे समर्थन केले आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांना टिळक पुरस्कार देण्यावरुन कॉंग्रेस नेत्यांमध्ये खडाजंगी सुरु झाली असल्याचे चित्र आहे.

- Advertisement -

पंतप्रधान मोदी यांना टिळक पुरस्कार जाहिर झाल्यानंतर प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी यावर सडकून टीका केली. लोकमान्य टिळक जिवंत असेत तर त्यांना नक्कीच आवडलं नसतं मोदींना त्यांच्या नावाचा पुरस्कार देणं, असे वक्तव्य पटोले यांनी केलं. मोदींना टिळक पुरस्कार दिला जात आहे याचे कॉंग्रेस नेते विश्वजीत कदम यांनी समर्थन केले आहे. लोकमान्य टिळक पुरस्कार एका खासगी ट्रस्टकडून दिला जातोय. देणाऱ्याने तो पुरस्कार दिला आणि घेणाऱ्याने तो पुरस्कार घेतला, अशी भूमिका विश्वजीत कदम यांनी मांडली. कॉंग्रेस नेत्यांमध्येच या पुरस्कारावरुन एकमत नसल्याचे चित्र आहे.

हेही वाचाःअखिलेश यादवांचा मुंबई दौरा, शरद पवारांची भेट घेणे टाळले?

- Advertisement -

गेल्या 41 वर्षांपासून लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येत असतो. यंदाच्या वर्षाच्या या पुरस्काराची घोषणा झाली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या पुरस्काराचे मानकरी ठरलेले आहेत. या पुरस्काराची घोषणा टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष दीपक टिळक आणि विश्वस्त डॉ. रोहित टिळक यांनी पत्रकार परिषद घेऊन केली. 1 ऑगस्टला लोकमान्य टिळक यांची 103वी पुण्यतिथी आहे. टिळकांच्या पुण्यतिथीनिमित्त गेल्या 41 वर्षांपासून हा पुरस्कार देण्यात येतो. यंदाच्या वर्षीच्या पुरस्काराची घोषणा झाली असून हा सोहळा पुण्यातील टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रांगणात करण्यात येणार आहे. याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

जागतिक स्तरावर मोदींनी भारताला महत्त्वाचे स्थान मिळवून दिले

दीपक टिळक यांच्या हस्ते हा पुरस्कार मोदींना दिला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली आत्मनिर्भर भारत या संकल्पनेअंतर्गत देशाने प्रगतीची नवी शिखरे सर केली आहेत. देशवासीयांमध्ये त्यांनी राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करुन देशाला जागितक पटलावर महत्त्वाचे स्थान मिळवून दिले आहे. या कार्यासाठी ट्रस्टच्या विश्वस्तांनी मोदींच्या नावाची या पुरस्कारासाठी एकमताने निवड केली आहे. या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नेते शरद पवार यांना निमंत्रित करण्यात आल्याचे पत्रकार परिषदेतून टिळक यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -