Eco friendly bappa Competition
घर अर्थसंकल्पीय अधिवेशन 2023 आज राज्याचा अर्थसंकल्प, शिंदे सरकारच्या पोतडीतून सर्वसामान्यांना काय मिळणार?

आज राज्याचा अर्थसंकल्प, शिंदे सरकारच्या पोतडीतून सर्वसामान्यांना काय मिळणार?

Subscribe

Maharashtra Assembly Budget 2023 | महाराष्ट्र सरकारने 2030 पर्यंत ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट ठेवले आहे. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी राज्याचा आर्थिक विकास 11 टक्के दराने वाढवावा लागणार आहे. हे उद्दीष्ट्य लक्षात ठेवूनच महत्त्वाच्या घोषणा होऊ शकतात.

Maharashtra Assembly Budget 2023 | मुंबई – महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आज 2023-24 या आर्थिक वर्षाचा राज्याचा अर्थसंकल्प (State Budget) सादर करणार आहेत. एकनाथ शिंदे सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प असेल. बुधवारी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, ‘आमचा पहिला अर्थसंकल्प गुरुवारी सादर होणार आहे. यामध्ये आम्ही दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करू. अर्थसंकल्प महिला आणि मध्यमवर्गाच्या गरजा आणि आकांक्षा पूर्ण करेल.’

शिंदे-फडणवीस सरकारच्या पहिल्याच अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठे पॅकेज जाहीर होण्याची शक्यता आहे. अवकाळी पावसामुळे ग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो. आगामी निवडणुका लक्षात ठेवून पायाभूत सुविधा प्रकल्प, आरोग्य आणि शिक्षणावर विशेष भर दिला जाऊ शकतो. तसंच, फडणवीस विदर्भासाठी मोठी घोषणा करण्याचीही शक्यता आहे. महाराष्ट्र सरकारने 2030 पर्यंत ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट ठेवले आहे. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी राज्याचा आर्थिक विकास 11 टक्के दराने वाढवावा लागणार आहे. हे उद्दीष्ट्य लक्षात ठेवूनच महत्त्वाच्या घोषणा होऊ शकतात.

- Advertisement -

७५,००० सरकारी पदे भरणे आणि रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करण्याबाबत फडणवीस घोषणा करू शकतात. याशिवाय राज्यात गुंतवणुकीला चालना देण्यासाठी नवीन योजनाही जाहीर केल्या जाऊ शकतात. अर्थसंकल्पीय तूट कमी करण्यासाठी अर्थमंत्री फडणवीस विविध पावले उचलू शकतात. कारण गेल्या वर्षी तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडी सरकारच्या वतीने 24 हजार कोटी रुपयांचा तुटीचा अर्थसंकल्प सादर केला होता.

आर्थिक सर्वेक्षण अहवालात काय म्हटलंय?

- Advertisement -

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत 2022-23 या वर्षासाठीचा महाराष्ट्र आर्थिक सर्वेक्षण सादर केला. 2022-23 या वर्षात राज्याची अर्थव्यवस्था 6.8 टक्के आणि भारतीय अर्थव्यवस्था 7.0 टक्के दराने वाढेल असा अंदाज आहे. 2022-23 या आर्थिक वर्षात वित्तीय तूट 2.5% राहण्याची अपेक्षा आहे. याशिवाय राज्याचा कृषी आणि संलग्न उपक्रम क्षेत्रात 10.2 टक्के, उद्योग क्षेत्रात 6.1 टक्के आणि सेवा क्षेत्रात 6.4 टक्के वाढ अपेक्षित आहे.

२०२१-२२ मध्ये राज्याचे दरदोई उत्पन्न २ लाख १५ हजार २३३ होते. आता आगामी २०२३-२४ या आर्थिक वर्षांत २ लाख ४२ हजार २४७ रुपयांची वाढ अपेक्षित आहे. अर्थसंकल्पीय अंदाजानुसार सन 2022-23 करिता राज्याची महसुली जमा `४,०३,४२७ कोटी, तर सुधारित अंदाजानुसार सन 2021-22 करिता ३,६२,१३३ कोटी आहे. अर्थसंकल्पीय अंदाजानुसार सन 2022-23 करिता कर महसूल आणि करेतर महसूल (केंद्रीय अनुदानासह) अनुक्रमे ३,०८,११३ कोटी आणि ९५,३१४ कोटी आहे. माहे एप्रिल ते नोव्हेंबर, 2022 या कालावधीत प्रत्यक्ष महसुली जमा २,५१,९२४ कोटी (अर्थसंकल्पीय अंदाजाच्या 62.4 टक्के) आहे.

- Advertisment -