घरताज्या घडामोडी...त्यांच्या नावात कितीही कुळे असले तरी शिवसेना नष्ट होणार नाही, उद्धव ठाकरेंचा...

…त्यांच्या नावात कितीही कुळे असले तरी शिवसेना नष्ट होणार नाही, उद्धव ठाकरेंचा घणाघात

Subscribe

देशात फक्त एकच पक्ष राहणार, असं जे.पी.नड्डा म्हणाले. तर बाकीचे पक्ष संपत चालले आहेत. शिवसेना हा संपत चाललेला पक्ष आहे, असे जरी बोलत असले तरी बघू. भाजपने ज्यांना प्रदेशाध्यक्ष केले त्यांच्या नावात किती कुळे आहेत हे मला माहिती नाही. पण त्यांची कितीही कुळे उतरली तरी ते शिवसेना नष्ट करू शकत नाहीत. मग ते ५२ असतील किंवा १५२ असतील. मला काही फरक पडत नाही, असं घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी नाव न घेता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांच्यावर निशाणा साधला आहे.

नड्डांना संघराज्य पद्धत संपवायची आहे का?

- Advertisement -

मार्मिक व्यंगचित्र साप्ताहिकाच्या 62 व्या वर्धापन दिनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे बोलत होते. प्रादेशिक पक्ष संपवून टाकणं हे लोकशाहीला घातक आहे. देशाच्या स्वातंत्र्याची मांडणी संघराज्य पद्धतीने करण्यात आली आहे. त्यामध्ये अनेक प्रदेश एकत्र आले आहेत. बंगाल, पंजाब, गुजरात, कर्नाटक, केरळ, उत्तर प्रदेश, बिहार आणि महाराष्ट्र आहे. ही सर्व घटकराज्ये एकत्र येऊन देशाचं स्वातंत्र्य अस्तित्वात आलं आहे. म्हणून आपल्या पद्धतीला संघराज्य पद्धती म्हणतात. नड्डांना संघराज्य पद्धत संपवायची आहे का?, असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.

आपण गुलामगिरीकडे चाललोय का?

- Advertisement -

अमृत महोत्सव साजरा करताना परत आपण गुलामगिरीकडे चाललोय का?, ही एक विचार करण्याची गोष्ट आहे. कारण सगळीकडे घर-घर तिरंगा लावत असताना राजकारण हे आपल्या पाचविला पुजलं आहे. कारण लोकशाही म्हटल्यानंतर राजकारण आलं. राजकारण म्हटल्यानंतर निवडणुका आल्या. तसेच निवडणुका म्हटल्यानंतर राजकीय पक्ष आले आणि ते आलेच पाहिजेत. प्रत्येक माणसाचं मत हे एकच असेल असं नाहीये. आपली मतं मांडण्याची आणि व्यक्त करण्याची मुभा जिथे मिळते, तिला लोकशाही म्हणतात. परंतु आपल्या देशाचा भारतीय जनता पार्टी हा राज्यकर्ता पक्ष आणि त्याचे अध्यक्ष जे.पी.नड्डा त्यांनी एक वक्तव्य केलं होतं. परंतु ते वक्तव्य लोकशाहीला घातक आहे की नाही?, याबाबत विचार केला गेला पाहीजे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

…तर अमृत महोत्सव कसला?

अमृत महोत्सव अमृतासारखा असला पाहीजे. अमृत महोत्सवात लोकशाही जर तुम्हाला मृतावस्थेत न्यायची असेल. तर अमृत महोत्सव कसला?, देशाचं स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण झाली. तसेच आपण साजरा करतोय. डीपीवर सुद्दा तिरंगा अपलोड करायचा. कारण आपल्याकडे सोशल मीडिया जोरात आहे. सोशल मीडिया बरोबर आहे, पण जे काही चाललंय ते तुम्हाला सोसल का?, हा सुद्धा विचार करा. डीपीवर तिरंगा ठेवणं ही आनंदाची बातमी आहे, असं ठाकरे म्हणाले.


हेही वाचा : काहींना वाटतं शिवसेना उघड्यावर पडलेली वस्तू, उद्धव ठाकरेंचा नाव न घेता शिंदेंवर निशाणा


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -