घरताज्या घडामोडीश्रीकांत देईल ती जबाबदारी पार पाडतो, मुख्यमंत्र्यांकडून पंतप्रधानांसमोर एकनाथ शिंदेंच्या मुलाचे कौतुक

श्रीकांत देईल ती जबाबदारी पार पाडतो, मुख्यमंत्र्यांकडून पंतप्रधानांसमोर एकनाथ शिंदेंच्या मुलाचे कौतुक

Subscribe

राज्याचा तसेच विकास हा वाहतुकीच्या मार्गाद्वारेच होत असतो. मग ती मेट्रो असो, रस्ते असो जलमार्ग असोत. जशा शरीरात रक्तवाहिन्या असतात तसेच विकासवाहिन्या असतात त्याचे जाळे जर घट्ट असेल तर अधिक विकास होतो असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना नेते आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कामाचे कौतुक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर केलं आहे. श्रीकांत शिंदे तरुण आहे. मेहनत करतो जी देईल ती जबाबदारी पार पाडतो अशा शब्दामध्ये मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले आहे. खासदार श्रीकांत शिंदे शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आहेत. ठाणे-दिवा दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे लोकार्पण पंतप्रधान मोदींच्या हस्ते करण्यात आले.

मुख्यमंत्री उद्दव ठाकरे ठाणे-दिवा दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या लोकार्पण कार्यक्रमास उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्हिसीद्वारे उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला आहे. श्रीकांत शिंदे तरुण आहे, मेहनत करतो, जी जबाबदारी देईल ती पार पाडतो अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्र्यांनी श्रीकांत शिंदेंचे कौतुक केलं आहे.

- Advertisement -

खासदार श्रीकांत तरुण आहे, खूप मेहनत घेतोय, त्याच्यावर एखादी जबाबदारी दिल्यास तो पार पाडतोच, अंबरनाथमध्ये एक प्राचीन मंदिर होतं. मी त्याला म्हणालो, श्रीकांत काहीतरी कर तिकडे. तर त्याने मंदिराच्या परिसरात खूप चांगलं काम केलं आहे. त्या ठिकाणी आता गेल्यास पवित्र वाटतं अशा शब्दामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी श्रीकांत शिंदेंचे कौतुक केलं आहे.

ठाणे-दिवा 5 व्या आणि 6 व्या मार्गिकेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही आभार मानले आहेत. या मार्गिकेच्या कामादरम्यान अनेक अडचणी आल्या परंतु त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मदतीने सोडवण्यात आल्या. त्यामुळे आज दिवास्वप्न सगळ्यांनी केलेल्या प्रयत्नामुळे पूर्ण होत आहे. राज्याचा तसेच विकास हा वाहतुकीच्या मार्गाद्वारेच होत असतो. मग ती मेट्रो असो, रस्ते असो जलमार्ग असोत. जशा शरीरात रक्तवाहिन्या असतात तसेच विकासवाहिन्या असतात त्याचे जाळे जर घट्ट असेल तर अधिक विकास होतो असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : ठाणे -दिवा मार्गात 2014 मध्ये अनेक अडथळे मात्र भाजप सरकारमुळे गती मिळाली, पंतप्रधानांचा विरोधकांवर निशाणा

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -