घरमहाराष्ट्रधनुष्यबाण शिवसेनेपासून कोणीही हिरावू शकत नाही, उद्धव ठाकरेंनी ठणकावले

धनुष्यबाण शिवसेनेपासून कोणीही हिरावू शकत नाही, उद्धव ठाकरेंनी ठणकावले

Subscribe

शिवसेनेतील आमदारांच्या बंडखोरीमुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. यात बंडखोर नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात राजकीय संघर्ष सुरु आहे. यात आता बंडखोर शिवसेना आमदार शिवसेनेच्या अधिकृत धनुष्यबाण या चिन्हावरही आपला दावा करत आहेत. यात दाव्यावर आज मुख्यमंत्र्यांनी स्पष्टचं सांगितल आहे. माझ्या शिवसैनिकांना सांगितलं, कायद्याच्या दृष्टीने बघितलं तर, घटनेमध्ये नमूद केलं आहे की,  धनुष्यबाण शिवसेनेपासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, त्यामुळे ती चिंता सोडा, अस उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, सध्या एका चर्चा सुरु आहे शिवसेनाच्या चिन्हा बद्दल, माझ्या शिवसैनिकांना सांगितलं कायद्याच्या दृष्टीने बघितलं तर, घटनेमध्ये नमूद केलं आहे. धनुष्यबाण शिवसेनेपासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, त्यामुळे ती चिंता सोडा. पण चिन्ह म्हटल्यानंतर मतदान पत्रिकेवरील चिन्ह ते महत्वाचे आहे ते आपलं धनुष्यबाण आहे ते आपलं कोणी हिरावून घेऊ शकत नाही.

- Advertisement -

पण लोकं नुसत धनुष्यबाणावरती  विचार नाही करत तर धनुष्यबाण हाती घेतलेल्या माणसाची देखील चिन्ह बघतात, की अरे याची चिन्हा काय बरोबर नाहीत, याची लक्षणं काय बरोबर नाही… हा शिवसेनेचा उमेदवार आहे, तरी लोकं विचार करुनचं आपल मतदान करत असतात. त्यानंतर मागच्या काळामध्ये जे काय काय झालं होतं सांगितलं होतं. याचा अर्थ असा नाही होत की, नवीन चिन्हाचा विचार करा… अजिबात नाही.. हे मुद्दाम तुम्हा सगळ्यांना एकत्र बोलवून ठामपणे सांगतो की, शिवसेनेपासून धणुष्यबाण कोणीही वेगळा करू शकत नाही. हे घटनात्मक, कायदेशीर अभ्यासक आहेत त्यांच्याशी बोलून मी सांगत आहे, हे मी उगीच माझ्या मनातलं बरं वाटाव म्हणून सांगत नाही, अशा शब्दात त्यांनी बंडखोर आमदारांवर देखील टीका केली आहे.

 

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -