घरमहाराष्ट्रUPSC Result 2023 : युपीएससीच्या निकालावर महाराष्ट्राची मोहर; राज्यातून समीर खोडे प्रथम

UPSC Result 2023 : युपीएससीच्या निकालावर महाराष्ट्राची मोहर; राज्यातून समीर खोडे प्रथम

Subscribe

केंद्रीय लोकसेवा आयोगाचा वर्ष २०२३ च्या मुख्य परिक्षेचा अंतिम निकालात एकूण निवड झालेल्या उमेदवारांपैकी जवळपास 8.6 टक्के महाराष्ट्रातून आहेत. राज्यातून समीर प्रकाश खोडे प्रथम आले असून त्यांनी देशात 42 वा क्रमांक पटकाविला आहे.

मुंबई : केंद्रीय लोकसेवा आयोगाचा वर्ष २०२३ च्या मुख्य परिक्षेचा अंतिम निकाल आज जाहीर झाला. यात देशातील एकूण 1016 उमेदवार यशस्वी झाले आहेत. यापैकी राज्यातील 87 हून अधिक उमदेवारांनी घवघवीत यश मिळविले आहे. एकूण निवड झालेल्या उमेदवारांपैकी जवळपास 8.6 टक्के महाराष्ट्रातून आहेत. राज्यातून समीर प्रकाश खोडे प्रथम आले असून त्यांनी देशात 42 वा क्रमांक पटकाविला आहे. तर या निकालात पहिल्या 100 उमेदवारांमधे महाराष्ट्रातील तीन उमेदवारांचा समावेश आहे. नेहा राजपूत यांनी 51 वा, तर अनिकेत हिरडे यांनी 81 वा क्रमांक पटकावला आहे. (UPSC Result 2023 Maharashtra stamp on UPSC result Sameer Khode first from the state)

महाराष्ट्रातील ८७ उमेदवारांची यादी

समीर प्रकाश खोडे (42), नेहा उद्धवसिंग राजपूत (51), अनिकेत ज्ञानेश्वर हिर्डे (81), विनय सुनील पाटील (122), विवेक विश्वनाथ सोनवणे (126), तेजस सुदीप सारडा (128), जान्हवी बाळासाहेब शेखर (145), आशिष अशोक पाटील (147), अर्चित पराग डोंगरे (153), तन्मयी सुहास देसाई (190), ऋषिकेश विजय ठाकरे (224), अभिषेक प्रमोद टाले (249), समर्थ अविनाश शिंदे (255), मनीषा धारवे (257), शामल कल्याणराव भगत (258), आशिष विद्याधर उन्हाळे (267), शारदा गजानन मद्येश्वर (285), निरंजन महेंद्रसिंह जाधवराव (287), समिक्षा म्हेत्रे (302), हर्षल भगवान घोगरे (308), वृषाली संतराम कांबळे (310), शुभम भगवान थिटे (359), अंकेत केशवराव जाधव (395), शुभम शरद बेहेरे (397), मंगेश पाराजी खिलारी (414), मयूर भारतसिंग गिरासे (522), अदिती संजय चौगुले (433), अनिकेत लक्ष्मीकांत कुलकर्णी (437), क्षितिज गुरभेले (441), अभिषेक डांगे (452), स्वाती मोहन राठोड (492), लोकेश मनोहर पाटील (496), सागर संजय भामरे (523), मानसी नानाभाऊ साकोरे (531), नेहा नंदकुमार पाटील (533), युगल कापसे (535), हर्षल राजेश महाजन (539), अपूर्व अमृत बालपांडे (546), शुभम सुरेश पवार (560), विक्रम जोशी (593), प्रियंका मोहिते (595), अविष्कार डेरले (604), केतन अशोक इंगोले (610), राजश्री शांताराम देशमुख (622), संस्कार निलाक्ष गुप्ता (629), सुमित तावरे (655), सुरेश लीलाधरराव बोरकर (658), अभिषेक अभय ओझर्डे (669), नम्रता घोरपडे (675), जिज्ञासा सहारे (681), श्रृति कोकाटे (685), अजय डोके (687), सूरज प्रभाकर निकम (706), श्वेता गाडे (711), अभिजित पखारे (720), कृणाल अहिरराव (732), हिमांशु टेभेंकर (738), सुमितकुमार धोत्रे (750), गौरी देवरे (759), प्रांजली खांडेकर (761), प्रितेश बाविस्कर (767), प्रशांत डांगळे (775), प्रतिक मंत्री (786), मयुरी माधवराव महल्ले (794), राहुल पाटील (804), सिध्दार्थ तागड (809), प्राजंली नवले (815), सिध्दार्थ बारवळ (823), ओमकार साबळे (844), प्रशांत सुरेश भोजने (849), प्रतिक बनसोडे (862), चिन्मय बनसोड (893), निखील चव्हाण (900), विश्वजीत होळकर (905), अक्षय लांबे (908), निलेश डाके (918), किशनकुमार जाधव (923), ऐश्वर्या दादाराव उके (943), स्नेहल वाघमारे (945), शुभम त्रंबकराव डोंगरदिवे (963), गौरव हितेश टेंभुर्णीकर (966), मयांक खरे (968), शिवानी वासेकर (971), श्रावण अमरसिंह देशमुख (976), श्रुती उत्तम श्रोते (981), सुशीलकुमार सुनील शिंदे (989), आदित्य अनिल बामणे (1015).

- Advertisement -

हेही वाचा – UPSC Result 2023 : केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर, आदित्य श्रीवास्तव देशात पहिला

केंद्र शासनाच्या विविध सेवांमधील रिक्त जागांसाठी सप्टेंबर 2023 मध्ये मुख्य परीक्षा घेण्यात आली. जानेवारी-एप्रिल 2024 दरम्यान परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या परिक्षेच्या निकालातील उत्तीर्ण 1016 उमेदवारांची केंद्रीय लोकसेवा आयोगाने विविध सेवेतील पदांच्या नियुक्तीसाठी शिफारस केली आहे. यामध्ये सामान्य (ओपन) गटातून – 347, आर्थिक मागास प्रवर्गातून (ईडब्ल्यूएस) 115, इतर मागासवर्गीय प्रवर्गातून (ओबीसी) – 303, अनुसूचित जाती प्रवर्गातून (एससी) – 165, अनुसूचित जमाती प्रवर्गातून- 86 उमेदवारांचा समावेश आहे. एकूण यशस्वी उमेदवारांमध्ये 37 दिव्यांग उमेदवारांचा (16 ऑर्थोपेडिकली अपंग, 06 दृष्टीहीन, 05 श्रवणदोष आणि 10 एकाधिक अपंग) यांचा समावेश आहे. लोकसेवा आयोगाने 240 उमेदवारांची आरक्षित सूची (Reserve List) तयार केली आहे. यामध्ये सामान्य गट – 120, आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस) – 36, इतर मागास वर्ग – 66, अनुसूचित जाती – 10, अनुसूचित जमाती – 04 उमेदवारांचा समावेश आहे. यासोबत एकूण चार दिव्यांग उमेदवारांचा समावेश आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -