घरमहाराष्ट्रआषाढी वारी २०२२ : आठवडाभर आधीच विठूरायाच्या दर्शनाची रांग गोपाळपूरमध्ये, यंदा यात्रा...

आषाढी वारी २०२२ : आठवडाभर आधीच विठूरायाच्या दर्शनाची रांग गोपाळपूरमध्ये, यंदा यात्रा ठरणार विक्रमी

Subscribe

या वर्षी मात्र पालखी सोहळे जिल्यात प्रवेश करण्यापुर्वीच भाविकांनी विक्रमी गर्दी केली आहे. त्यामुळे या वर्षी विठ्ठल भक्तांच्या संख्येत मोठी वाढ होणार असल्याचं चित्र दिसत आहे.

कोव्हीडमुळे गेली दोन वर्ष आषाढी वारी(ashadhi wari 2022) होऊ शकली नाही पण या वर्षी मात्र आषाढी वारी अगदी आनंदात आणि उत्सहात आणि आनंदात पार पडत आहे. त्यामुळे वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरही आनंद आहे. विठुरायाचा जयघोशात वारी मजल दरमजल करत पंढरपूरकडे(pandharpuur) प्रस्थान करत आहे. आषाढी वारीसाठी लाखो भाविक पंढरपूरच्या दिशेने येत असतात. यंदाची आषाढी वारी १० जुलै होणार आहे. आषाढी एकादशीला आठवड्या भाराचा अवधी राहीला असला तरी पदस्पर्शाची रांग थेट गोपाळपूर येथे उभारलेल्या पत्राशेड पर्यंत पोहोचली आहे. खरंतर ही दर्शनाची रांग पालखी सोहळे पंढरपूरच्या जवळ आलयावर गोपाळपूर पर्यंत पोहोचते. पण या वर्षी मात्र पालखी सोहळे जिल्यात प्रवेश करण्यापुर्वीच भाविकांनी विक्रमी गर्दी केली आहे. त्यामुळे या वर्षी विठ्ठल भक्तांच्या संख्येत मोठी वाढ होणार असल्याचं चित्र दिसत आहे.

आणखी वाचा –  एकादशीच्या दिवशी चुकूनही करू नका मांसाहार; अन्यथा…

- Advertisement -

आणखी वाचा – Vastu Tips : यंदा श्रावण महिन्यात लावा ‘हे’ झाड; संपूर्ण आयुष्यभर व्हाल…

 

- Advertisement -

पांडुरंगाच्या दर्शनाची रांग मंदिराजवळील सात मजली दर्शन मंडपातून विणे गल्ली माहे चंद्रभागा(chandrabhaga) तीरावरून गोपाळपूर येथे उभारलेल्या दहा पत्राशेड पर्यंत पोहोचली आहे. याच पत्राशेडच्या पुढे पाच किमी अंतरापर्यंत आणखी एक शेड बांधून दर्शन रांगेसाठी जागा तयार करण्यात आली आहे. गरज भासल्यास रांगेसाठी ही जागा अजून वाढविण्यात येईल. या रांगेवर पत्र्याचे आवरण असल्याने पावसातही भाविक बिजणार नाहीत आणि त्यांच्या भाविकांच्या दर्शनामध्ये व्यत्यय सुद्धा येणार नाही. त्याचबरोबर यात्रेच्या शेवटच्या तीन दिवसांत विठुरायाच्या दर्शनासाठी आलेल्या प्रत्येक भाविकाला चहा, न्याहारी आणि भोजनाची व्यवस्था मंदिर समितीने केली आहे. यासाठी दोन मोठे देणगीदार सुद्धा पुढे आले आहेत असे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी सांगितले आहे. सध्या दर्शन रांगेत पन्नास हजारांपेक्षा जास्त भक्तगण सहभागी आहेत. तर आज दर्शनासाठी ७ ते ८ तास एवढा कालावधी लागणार आहे.

आणखी वाचा –  आषाढी एकादशीनिमित्त मराठवाडा ते पंढरपूर विशेष ट्रेन

आणखी वाचा – आषाढी वारी २०२२: संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या नीरा स्नान सोहळ्याचा वारकऱ्यांनी आनंद…

एकीकडे आषाढी(ashadhi ekadashi) वारीचा वारीचा आनंद दिवसागणिक वाढत असताना दुसरीकडे पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचा कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे मंदिर समितीच्या कायद्यानुसार, नवीन समिती स्थापन होई पर्यंत मंदिरावर प्रशासक सभापती म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना पदभार सांभाळावा लागणार आहे. मंदिर समिती कायद्यानुसार नियुक्त समितीची मुदत पाच वर्षांची असते. अतुल भोसले त्यांच्या अध्यक्षतेखाली पाच वर्षांपूर्वी ही समिती तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस9devendra fadnavis) यांनी नेमली होती आणि आता ३ जुलै रोजी या समितीचा कार्यकाळ संपला आहे. पण सध्या राज्यातच सत्तांतर झाल्यामुळे अजूनही राज्यात मंत्रिमंडळ अस्तित्वात आलं नसल्याने आषाढी एकादशीपूर्वी नवीन समितीची निवड करणे तूर्तास शक्य नाही. अशाचवेळी नियमानुसार जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रशासक म्हणून कार्यभार सोपविण्याची तरतूद आहे. महाराष्ट्राच्या नवीन मुख्यमंत्र्यांना यासाठी विधी आणि न्याय विभागाकडून लवकरात लवकर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीवर प्रशासक म्हणून जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती करावी लागणार आहे.

 

आणखी वाचा – आषाढी वारी २०२२ : ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे इंदापुरात पहिले रिंगण पार पडले

आणखी वाचा – आषाढी वारी २०२२ : आजपासून विठुरायाचे २४ तास दर्शन होणार, पंढरपुरात जमणार…

डोईवर तुळस, हातात टाळ चिपळ्या आणि मुखात विठुरायाचं नाव घेत अनेक भक्तगण वारीत सहभागी होत असतात. यावर्षी वारी पायी होत असल्याने वारकऱ्यांमध्येही विशेष आनंद पसरला आहे. विठुरायाच्या भेटीसाठी ऊन, वर आणि पाऊस यांची तमा न बाळगता वारकरी कित्येक किलो मीटरचे अनंत पादाक्रांत करत पंढरपूर गाठत असतात. दोन वर्षांच्या मोठ्या कालावधीनंतर या वर्षीच्या वारीचा आंनद खरोखरच विशेष आहे. आषाढी वारीमुळे संपूर्ण महाराष्ट्रातच भक्तिमय वातावरण झाले आहे.

 

 

 

 

 

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -