घरमहाराष्ट्रअखेर नाशिक, नगरमधून जायकवाडीला पाणी सोडले

अखेर नाशिक, नगरमधून जायकवाडीला पाणी सोडले

Subscribe

जायकवाडीला पाणी सोडण्यासा अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील स्थानिकांचा विरोध आहे. हे लक्षात घेता मोठ्या पोलीस बंदोबस्तात पाणी सोडण्यात येत आहे.

दुष्काळामुळे तहानलेल्या मराठवाड्याची तहान अखेर भागणार आहे. नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील धरणामधून जायकवाडी धरणामध्ये पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे आता मराठवाड्याचा पाणी प्रश्न सुटणार आहे. नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील धरणामधून सकाळी आठ वाजल्यापासून मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये पाणी सोडण्यात येत आहे. नाशिकच्या गंगापूर आणि दारणा धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. जायकवाडीला पाणी सोडले जाऊ नये यासाठी गेल्या अनेक दिवसापासून वाद सुरु होता.

हायकोर्टाने याचिका फेटाळली

नाशिकच्या गंगापूर धरणातून संपूर्ण नाशिक शहराला पाणी पुरवठा केला जातो. या धरणातून जायकवाडीला कोणत्याही परिस्थितीमध्ये पाणी सोडू नये यासाठी सत्ताधारी भाजप वगळता इतर सर्व पक्षांनी आंदोलन केली. यासंदर्भात अहमदनगरच्या विखे-पाटील सहकारी साखर कारखाना आणि इतरांनी मिळून केलेली याचिका मुंबई हायकोर्टाने बुधवारी फेटाळली. त्यामुळे जायकवाडीला पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा झाला.

- Advertisement -

धरणातून पाण्याची विसर्ग सुरु

नाशिकच्या गंगापूर आणि दारणा धरणातून जायकवाडीसाठी पाणी सोडण्यात आले आहे. तर अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे आणि मुळा धरणातून जायकवाडीसाठी पाणी सोडण्यात आले आहे. निळवंडे आणि मुळा धरणाच्या पाच दरवाजामधून ६००० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. प्रवरा नदीतून पाण्याचा १५० किमी प्रवास मराठवाड्याच्या दिशेने सुरु झाला आहे. जायकवाडीला पाणी सोडण्यात आले आहे. अशावेळी पाणी चोरी रोखण्यासाठी पाण्याच्या मार्गावरील १९ तास गावांचा विज पुरवठा खंडित करण्यात आला आहे.

पोलीस बंदोबस्तात पाणी सोडले

जायकवाडीला पाणी सोडण्यासा अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील स्थानिकांचा विरोध आहे. हे लक्षात घेता मोठ्या पोलीस बंदोबस्तात पाणी सोडण्यात येत आहे. पाण्यासाठी नाशिक विरोधात औरंगाबाद असा संघर्ष सध्या सुरुच आहे. धरणाच्या पाणी प्रवाहित मार्गावर चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसंच नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसंच कोणीही आंदोलन केले तर त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.

- Advertisement -

पाणी वाद सुरुच

गेल्यावर्षी देखील मराठवाड्याच्या जायकवाडी धरणामध्ये दुष्काळामुळे पाणी सोडण्यावरुन वाद झाला होता. त्यावेळी देखील विरोध करण्यात आला होता. यंदा नाशिक जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्याने गंगापूर धरण चांगले भरले आहे. नाशिकचे पाणी नाशिकरांनाच देण्यात यावे यासाठी सर्व जण जायकवाडीला पाणी सोडण्यास विरोध करत होते.

संबंधित बातम्या – 

जायकवाडीला पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा

३१ ऑक्टोबरनंतर जायकवाडीला पाणी सोडणार

नाशिकमध्ये ‘पाणी’ पेटलं; जायकवाडीला पाणी द्यायला विरोध

नाशिकचे पाणी जायकवाडीला दिल्यास पालकमंत्र्यांना शहरात प्रवेश नाही

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -