घरमहाराष्ट्रपाच महिन्यांपूर्वीच आपण मोठं ऑपरेशन केलं..., रुग्णालयांच्या समस्यांवर मुख्यमंत्र्यांचं उत्तर

पाच महिन्यांपूर्वीच आपण मोठं ऑपरेशन केलं…, रुग्णालयांच्या समस्यांवर मुख्यमंत्र्यांचं उत्तर

Subscribe

"बैठक घेऊन मुंबईकरांचं आरोग्य चांगलं राहिल याकडे लक्ष देऊ. आधीच्या सरकारने दुर्लक्ष केल्याने अशी अवस्था झाली आहे. मुंबई बदलत आहे, मुंबईचा विकास करू. चांगल्या आरोग्यासाठी जे करता येईल ते सर्व करू," असं आश्वसानही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

नागपूर – हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस मुंबई पालिकेच्या हद्दीत असलेल्या रुग्णालयातील समस्यावंर गाजत आहे. भाजपाच्या अनेक आमदारांनी त्यांच्या मतदारसंघातील पालिका रुग्णालयांची अवस्था, रिक्त पदे, शल्यचिकित्सा विभागांची दूरवस्था याबाबत प्रश्न मांडले. यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदारांना आश्वस्त केले आहे. आश्वस्त करताना त्यांनी त्यांच्या बंडखोरीचाही दाखला दिला आहे. पाच महिन्यांपूर्वी आपण मोठं ऑपरेशन केलंय. आता त्यापेक्षाही मोठे ऑपरेशन आपण करू, असं एकनाथ शिंदे मिश्किलीत म्हणाले.

हेही वाचा – काही गोष्टी तुमच्याकडूनच शिकलो, फडणवीसांचा अजितदादांना टोला

- Advertisement -

भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी शताब्दी रुग्णालयातील दूरवस्था आज सभागृहात मांडली. शताब्दी रुग्णालयात एकच ऑपरेशन थिएटर आहे. या एका ऑपरेशन थिएटरसाठी फक्त एक ऑपरेशन अटेन्डट आहे. त्यामुळे एकाच शीफ्टवर ऑपरेशन करावं लागतं, असं अतुल भातखळकर म्हणाले. तसंच, या ठिकाणी लवकरात लवकर पदभरती व्हावी, अधिक ऑपरेशन थिएटर निर्माण व्हावे अशी मागणी त्यांनी केली. यासाठी त्यांनी बैठक घेण्याचेही आवाहन केलं आहे.

अतुल भातखळकरांच्या या मागणीला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, अतुल भातखळकरांनी मांडलेले मुद्दे रुग्णांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. संपूर्ण रुग्णालयात ऑपरेशनसह सर्व सोयी सुविधांवर आपण कार्यवाही करू. पाच महिन्यांपूर्वी आपण मोठं ऑपरेशन केलं, आताही मोठे ऑपरेशन आपण करू, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

- Advertisement -

“बैठक घेऊन मुंबईकरांचं आरोग्य चांगलं राहिल याकडे लक्ष देऊ. आधीच्या सरकारने दुर्लक्ष केल्याने अशी अवस्था झाली आहे. मुंबई बदलत आहे, मुंबईचा विकास करू. चांगल्या आरोग्यासाठी जे करता येईल ते सर्व करू,” असं आश्वसानही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

हेही वाचा – ही कर्नाटक, गुजरात, तेलंगणाची कामं नाहीत; विकासकामांच्या स्थगितीवरून अजित पवार संतापले

डॉ.बाबासाहेब रुग्णालयात पदभरती करू

कांदिवलीतील भारतरत्न डॉ.बाबासाहेब रुग्णालयात अतिदक्षता विभाग आणि डायलेसिस सेंटर आऊटसोर्स केले जातात. एखादा विभाग आऊटसोर्स केल्यास त्यावर पालिकेचं नियंत्रण खूप कमी राहतं, असा मुद्दा आमदार आशिष शेलार यांनी सभागृहात मांडला. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. याठिकाणी लवकरच कायमस्वरुपी पदे भरण्यात येतील, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. तसंच, औषध पोहोचवण्यात दिरंगाई होत असल्यास त्याची चौकशी केली जाईल आणि रुग्णांना वेळेवर औषधे पोहोचवले जातील, याची काळजी महापालिका प्रशासन घेईल, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -