घरमहाराष्ट्रशी शी, आम्ही त्यांच्याकडे लक्षही देत नाही, आदित्य ठाकरे कोणाबद्दल बोलले?

शी शी, आम्ही त्यांच्याकडे लक्षही देत नाही, आदित्य ठाकरे कोणाबद्दल बोलले?

Subscribe

नागपूर : दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची माजी व्यवस्थापक दिशा सालियन मृत्यू प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. विधानसभेत काल हा मुद्दा उपस्थित करताना सत्ताधाऱ्यांचा रोख माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) या प्रकरणाचा फेरतपास केला जाईल, असे जाहीर केले. त्यानंतर सायंकाळी एका केंद्रीय मंत्र्यांनी दिशा सालियन प्रकरणाचे पुरावे एसआयटीला देण्याची तयारी दर्शवली. त्यावर आज आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली.

विधानसभेत नागपूरमधील एनआयटी भूखंड वाटपाच्या मुद्द्यावरून विधिमंडळात विरोधक सलग दोन दिवस आक्रमक झाले होते. त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. पण तिसऱ्या दिवशी सत्ताधारी आमदारांनी दिशा सालियनच्या मृत्यूप्रकरणी आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी एसआयटीची घोषणा करण्यात आली.

- Advertisement -

दिशा सालियनची आत्महत्या नसून हत्या आहे. याप्रकरणात आदित्य ठाकरे यांचा सहभाग आहे. त्यामुळे याप्रकरणाचे पुरावे नवीन एसआयटीला देऊ, असे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी गुरुवारी सायंकाळी सांगितले. दिशा सालियनची आत्महत्या झाली, त्यावेळचे मोबाईल पुरावे मिळायला हवेत. ते पुरावे आता इतक्या दिवसांनी मिळतील की नाही, ते माहीत नाही. मात्र आमच्याजवळ जे पुरावे आहेत, ते आम्ही एसआयटीला सादर करू, असे सांगत, याप्रकरणात अभिनेता डिनो मारिया याचाही सहभाग असल्याचा दावा केला.

तसेच, या घटनेचा एक प्रत्यक्षदर्शी असून तोही पुढे येईल. इतके दिवस भीतीमुळे तो समोर येत नव्हता. पण आता उद्धव ठाकरेंचे महाविकास आघाडी सरकार नाही. त्यामुळे सत्य नक्कीच बाहेर येईल, असा दावाही मंत्री नारायण राणे यांनी केला. त्याबद्दल एबीपी माझा या वृत्तवाहिनी आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया विचारली असता, ते म्हणाले, शी शी, आम्ही त्यांच्याकडे लक्षही देत नाही. त्यांनी अद्याप त्यांच्याकडे असलेल्या एमएसएमईचा फुलफॉर्म सांगितलेला नाही, अशी खोचक टिप्पणीही त्यांनी केली.

- Advertisement -

हेही वाचा – महाराष्ट्रातील मंत्र्यांनी तोंड बंद ठेवल्याने बोम्मईंची जीभ वळवळतेय, संजय राऊतांचा पलटवार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -