घरमहाराष्ट्रज्येष्ठ नेत्याला धमकी आणि ब्लॅकमेलिंग, शेवाळेंकडून मनीषा कायदेंच्या चौकशीची मागणी

ज्येष्ठ नेत्याला धमकी आणि ब्लॅकमेलिंग, शेवाळेंकडून मनीषा कायदेंच्या चौकशीची मागणी

Subscribe

आरोप प्रत्यारोप सुरू असताना आता राहुल शेवाळींनीही मनीषा कायंदे यांच्याविरोधात बंड पुकारले. त्यांनी मनीषा कायंदे यांच्यावरही ब्लॅकमेलिंग आणि फसवणुकीचा आरोप केला आहे.

मुंबई – शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे (MP Rahul Shewale) यांच्यावर बलात्कार, मारहाण आणि छळवणुकीचा आरोप असल्याने त्यांच्या एसआयटी चौकशीची मागणी करणाऱ्या मनीषा कायंदे (MLA Manisha Kayande) यांच्यावरही आता गंभीर आरोप करण्यात आले आहेत. मनीषा कायंदे यांनी ज्येष्ठ नेत्याला धमकावत, ब्लॅकमेलिंग करून फसवणूक केल्याचा आरोप राहुल शेवाळे यांनी केला आहे. याप्रकरणी कायंदे यांची चौकशी व्हावी अशी मागणीही शेवाळे यांनी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून राहुल शेवाळे यांनी हे गंभीर आरोप केले आहेत.

हेही वाचा – दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची SIT मार्फत चौकशी; उपमुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा

- Advertisement -

राहुल शेवाळे यांनी दिशा सालिअनप्रकरणी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधत लोकसभेत हा मुद्दा मांडला होता. बिहार पोलिसांच्या चौकशी अहवालानुसार एयू नावाने रिया चक्रवर्तीला जे ४४ कॉल्स आले होते ते आदित्य उद्धव ठाकरेंचे असल्याचं शेवाळेंनी लोकसभेत सांगितलं होतं. यावरून राज्यातही हलकल्लोळ झाला. विधिमंडळात हा मुद्दा गाजल्याने दिशा सालिअनप्रकरणी एसआयटी चौकशीचे आदेश देण्यात आले.

हेही वाचा – आता राहुल शेवाळे अडचणीत, बलात्कारप्रकरणात एसआयटी चौकशीचे निर्देश

- Advertisement -

दरम्यान, आमदार मनीषा कायंदे यांनी विधान परिषदेत राहुल शेवाळेंविरोधात गंभीर आरोप करत त्यांच्याविरोधात एसआयटी चौकशी करण्याची मागणी केली. दुबईस्थित महिलेने राहुल शेवाळे यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार दाखल करून पोलीस कारवाई करत नसल्याचं मनीषा कायंदे यांनी सांगितलं. त्यांच्या आग्रही मागणीनंतर विधान परिषदेच्या सभापती नीलम गोऱ्हे यांनी राहुल शेवाळे प्रकरणातही एसआयटी नेमली आहे.

आरोप प्रत्यारोप सुरू असताना आता राहुल शेवाळेंनीही मनीषा कायंदे यांच्याविरोधात बंड पुकारले. त्यांनी मनीषा कायंदे यांच्यावरही ब्लॅकमेलिंग आणि फसवणुकीचा आरोप केला आहे.

हेही वाचा – बलात्काराचे आरोप असलेल्यांनी आदित्य ठाकरेंवर बोलू नये, राऊतांचा शेवाळेंवर निशाणा

काय आरोप आहेत?

  • मनीषा कायंदे यांनी २००७ साली ज्येष्ठ नेत्यासोबत लग्न केले. मात्र, याच नेत्याविरोधात २०११ साली लैंगिक शोषण केल्याची तक्रार मनीषा कायंदे केली.
  • भाजपाकडून सायन विधानसभा येथून २००९ निवडणूक लढवली. यासाठी त्यांनी संबंधित नेत्याला ब्लॅकमेलिंग करत ५० लाखांची मागणी केली.
  • संबंधित ज्येष्ठ नेत्याच्या स्वीय सहाय्यकासह आक्षेपार्ह संबंधावरही आरोप करण्यात आले.
  • लालबाग येथील १ बीएचके फ्लॅटमध्ये टाळे लावत घरावर ताबा घेतला.
  • संबंधित नेत्याकडून ३ वेळा विदेश यात्रा केली. सोने घेतले.
  • एमडी कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून लावण्यासाठी १ कोटींचा सरकारी विकास निधी दिला.
  • पीएचडीसाठी गाईड सुभाषनगर, चेंबूर येथील प्राध्यापक संबंधित ज्येष्ठ नेत्यानेच दिला. तसंच, त्यांनीच खर्च केला.
  • कुप्रसिद्ध गुंड डी.के.राव यांच्या मदतीने संबंधित ज्येष्ठ नेत्याला धमकावण्यातही आले.

 

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -