घरताज्या घडामोडीअनिल परब यांच्यावरील भ्रष्टाचाराचे प्रकरण नक्की काय आहे? त्यांचे बॅकग्राऊंड काय? ते...

अनिल परब यांच्यावरील भ्रष्टाचाराचे प्रकरण नक्की काय आहे? त्यांचे बॅकग्राऊंड काय? ते शिवसेनेत कसे मोठे झाले?

Subscribe

३०० कोटी भ्रष्टाचाराचे प्रकरण काय आहे

शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अडचणी चांगल्याचा वाढल्या आहेत. परब यांच्याविरोधात १ नव्हे तर तब्बल ६ प्रकरणांमध्ये चौकशी सुरु आहे. यामध्ये ३०० कोटीचा भ्रष्टाचार केला असल्याचा मोठा आरोप अनिल परब याच्यावर करण्यात आला आहे. परिवहन विभागात अधिकाऱ्यांच्या बदलीमध्ये ३०० कोटींचा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप नाशिकमधील परिवहन विभागातील निलंबित मोटार वाहन निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी केला आहे. गजेंद्र पाटील हे आरटीओ विभागातील निलंबित अधिकारी आहेत त्यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासह ६ बड्या अधिकाऱ्यांविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप करत पंचवटी पोलिसांत तक्रार केली आहे.

परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर राज्यभरातील आरटीओ विभागात ३०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या आरोपाचे गांभीर्य लक्षात घेऊन या तक्रारीवर चौकशी सुरु करण्यात आली आहे. माजी खासदार किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांच्याविरोधात आरटीओ ट्रान्सफर, एसटी तिकीट, दापोलीचा रिसॉर्ट, म्हाडाची जमीन, बीएमसी कंत्राटदार या घोटाळ्यांचा पुराव्यानिशी आरोप केला आहे. या प्रकरणात चौकशी सुरु आहे. यातील काही प्रकरणांची राज्यपाल, उच्च न्यायालय, लोकायुक्तांनी दखल घेतली आहे. तसेच सीबीआय, ईडी,एनआयए,नाशिक पोलिस,पर्यावरण मंत्रालय, जिल्हाधिकारी या विविध पातळीवरील यंत्रणांचा तपास सुरु आहे. यामुळेच अनिल परब येत्या २ महिन्यांचे पाहुणे असल्याचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

३०० कोटी भ्रष्टाचाराचे प्रकरण काय आहे

परिवहन विभागातील निलंबित मोटर वाहन निरीक्षक जितेंद्र पाटील यांनी परिवहन मंत्री अनिल परब आणि परिवहन विभागातील कार्यपद्धतीवर भ्रष्टाचाराचे आणि गैरप्रकाराचे आरोप केले होते. त्यामध्ये प्रमुख आरोप म्हणजे ट्रान्सफर पोस्टिंगमध्ये झालेल्या मोठ्या प्रमाणातील भ्रष्टाचार. या संपुर्ण प्रकरणात ३०० कोटी रूपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे जितेंद्र पाटील यांनी आपल्या तक्रारीत म्हटले होते. यामध्ये उपपरिवहन अधिकारी बजरंग खरमाटे हे बदल्या मॅनेज करत असून अर्थपूर्ण व्यवहार करत आहेत. खरमाटे यांना अनिल परब यांनी अभय दिले असल्याचा आरोपही करण्यात येत आहे.


हेही वाचा : अनिल परब फक्त दोन महिन्यांचे पाहुणे, किरीट सोमय्यांचा दावा

- Advertisement -

अनिल परब यांची प्रतिक्रिया

निलंबित मोटार वाहन निरीक्षक निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी माझ्याविरुद्ध तसेच परिवहन आयुक्त व इतर पाच अधिकाऱ्यांविरोधात पंचवटी पोलीस स्टेशन, नाशिक येथे दिलेली तक्रार ही पूर्णतः निराधार व खोटी आहे. विभागातील अनेक तक्रारींच्या पार्श्वभूमीवर निलंबित झालेल्या अधिकाऱ्याने सूडबुद्धीने खोटे आरोप करून माझी व महाविकास आघाडी सरकारची बदनामी करण्याचे षडयंत्र आखले आहे. मंत्र्यांवर आरोप करून राज्य सरकार या मंत्र्यांचे काहीही वाकडे करू शकत नाही असे भासवून, उच्च न्यायालयामार्फत CBI चौकशीची मागणी करणे आणि सरकार व मंत्र्यांची प्रतिमा मालिन करणे, या राजकीय हेतूने केलेली ही तक्रार आहे असे परिवहन मंत्री अनिल परब यांनी म्हटले आहे.

२० वर्षांपासून शिवसेनेत कार्यरत

शिवसेनेची कायद्याची बाजू सांभाळणारे अनिल परब हे मागील २० वर्षांपासून शिवसेनेत कार्यरत आहेत. अनिल दत्तात्रय परब असे त्यांचे पूर्ण नाव असून अनिल परब यांनी आपले बीकॉमचे शिक्षण पुर्ण केल्यानंतर एलएलबीचं (वकिली) शिक्षण पुर्ण केले आहे. अनिल परब यांनी वकिली करता नेहमी सामाजिक कार्यक्रम आणि सार्वजनिक उत्तवाचे आयोजन, गरीब विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकाचे वाटप अशा कार्यक्रमातून हळू हळू राजकारणात येऊल लागले. अनिल परब नंतर विद्यार्थी सेनेच्या आंदोलनात सक्रीय होऊ लागले. अनिल परब यांच्या पुढाकारामध्ये अनेक विद्यार्थी सेनेचे आंदोलने झाली. अनिल परब राजकारणात रुळू लागले यानंतर २००१ मध्ये अनिल परब यांच्यावर शिवसेनेचे विभाग प्रमुख म्हणून जाबाबदारी देण्यात आली आहे.

अनिल परब यांनी २००१ पासून ते २००४ पर्यंत शिवसेनेत महत्त्वाच्या भूमिकांची जबाबदारी उत्तमरित्या पार पाडली. अनिल परब यांनी केलेल्या कामाची दखल घेत त्यांना २००४ साली विधानपरिषदेवर पाठवण्यात आले. यानंतर सलग २००४ ते १०१८ पर्यंत विधानपरिषदेतील कामकाज पाहत आले आहेत. २०१५ साली वांद्रे पश्चिममधील पोटनिवडणूकीमध्ये अनिल परब यांच्यावर निवडणूक प्रचाराची जबाबदारी देण्यात आली होती. या पोटनिवडणूकीत शिवसेनेकडून तृप्ती सावंत उमेदवार होत्या तर काँग्रेसकडून नारायण राणे उमेदवार होते. यावेळी दोन्ही पक्षांमध्ये अटीतटीची लढाई सुरु झाली होती. परंतु अनिल परब यांना देण्यात आलेली जबाबदारी उत्तमरित्या पार पाडत शिवसेनेला विजय मिळवून दिला होता. या विजयानंतर अनिल परब यांच्यावर शिवसेनेत अनेक जबाबदाऱ्या पडू लागल्या त्या जबाबदाऱ्याही अनिल परब उत्तमरित्या पार पाडत होते.


हेही वाचा: अनिल परब यांनी दापोलीत १० कोटींचं बेकायदेशीर रिसॉर्ट बांधलं; किरीट सोमय्यांचा आरोप


पुढे २०१७ साली मुंबई महापालिकेची निवडणूक आली त्यावेळी भाजप आणि शिवसेनेत असलेल्या युतीत फुट पडली. महापालिकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप भाजपतर्फे शिवसेनेवर करण्यात आला. परंतु या आरोपांना अनिल परब यांनी सडेतोड उत्तर दिले. शिवसेनेवर केलेल्या आरोपांना अनिल परब यांनी कायद्याच्या भाषेत उत्तर दिले होते. महापालिका निवडणूक शिवसेनेने पुन्हा जिंकून भ्रष्टाचाराचा मुद्दा खोटा ठरवला या सर्वात अनिल परब यांचे काम मात्र पुन्हा एकदा वठून समोर आले होते.

महाविकास आघाडीमध्ये परिवहिन मंत्रीपद

२०१९ मध्ये विधानसभा निवडणूक झाली. यावेळी भाजप आणि शिवसेनेचे युती सरकार होते. परंतु मुख्यमंत्री पदाच्या मुद्द्यावर या दोन्ही पक्षात फारकत आली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येत महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. यामध्ये खातेवाटप करताना अनिल परब यांच्या कामाची दखल घेत त्यांना परिवहन मंत्रीपदी नियुक्त करण्यात आले. यावेळी अनिल परब हे पहिल्यांदा मंत्री बनले. अनिल परब यांना मंत्री बनवल्याने शिवसेनेत दोन गट पडल्याचेही चित्र निर्माण झाले होते. तसेच पक्षात काही नाराज कार्यकर्त्यांची अंतर्गत धूसपूस बाहेर येत होते. अनिल परब यांच्यापेक्षा वरिष्ठ असणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलून अनिल परब यांना मंत्री बनवण्यात आले आहे.


हेही वाचा : परबांचा ‘अनिल’ देशमुख होऊ नये म्हणून, महाविकास आघाडीची फिल्डिंग


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -