यात फार गोंधळून जायचे कारण नाही, शहाजीबापूंना अजित पवारांचा मोलाचा सल्ला

राज्य विधानसभेत आज एकनाथ शिंद सरकारने बहुमताची परीक्षा पास केली यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अभिनंदनाचा प्रस्तावावर बोलताना अजित पवार यांनी शहाजी पाटील यांंनासल्ला दिला.

Shahajibapu

राज्य विधानसभेत आज एकनाथ शिंद सरकारने बहुमताची परीक्षा पास केली यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अभिनंदनाचा प्रस्तावर ठेवण्यात आला. या प्रस्तावावर बोलताना राष्ट्रावादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी जोरदार टोलेबाजी केली. यावेळी त्यांनी शहाजी पाटील यांचा चांगलाच समाचार घेतला आणि त्यांना मोलाचा सल्लाही दिला.

शहाजी पाटलांना अजित पवार काय म्हणाले –

गेल्या काही दिवसात अनेकांना खूप काही बघायला मिळाले. सूरतला जायला मिळाले, तिथून गुवाहाटीला जायला मिळाले तिथून गोव्याला गेले. दहा दिवसात आमदारांना हयातीत इतके फिरायला मिळाले नसेल, असे अजित पवार म्हणाले. यावेळी शहाजी पाटील यांचा उल्लेख करत अजित पवार म्हणाले की, शहाजी बापू म्हणतात काय झाडी काय डोंगार काय हाटेल, ओक्के ओक्के. बापू आपण 95 ला एकत्र निवडून आलो. यात फार गोंधळून जायचे कारण नाही. ही मोठी लोके एकत्र कधी येतील कळणारही नाही. तुम्ही मागे राहाल. बाकीचे म्हणतील आम्ही कधी तसे म्हटले नव्हतो, असे अजित पवार म्हणाले.

केसरकरांना अजित पवारांचा टोला-

यावेळी अजित पवार यांनी, शिंदे यांच्या नावाची मुख्यमंत्री म्हणून घोषणा झाल्यावर कारण काही आमदारांनी टेबलावर जाऊन डान्स केला. सत्ता येत असते सत्ता जात असते. सगळे लोकं पाहात असतात. प्रवक्ता म्हणून केसरकर यांनी दिलगिरी व्यक्त केली. त्यांच्यावर राष्ट्रवादीचे संस्कार आहेत, असे ते म्हणाले. अजित पवार म्हणाले की, मंत्रिमंडळाचे स्थिरस्थावर होत नाहीत तोवर काही जण गप्प आहेत. त्यातले अब्दुल सत्तार एक आहेत. सूरतला जाण्याआधी आमच्यासोबत अब्दुल सत्तार दोन तास गप्पा मारत बसले होते आणि लगेच सूरतला गेले, असे पवार यांनी म्हणताच एकच हशा पिकला.

राज्यपालांना टोला –

काही गोष्टी न्यायप्रविष्ट आहेत त्याआधी तुम्ही बहुमताची चाचणी घेतली. ठराव इतका घाईत आणण्याची गरज नव्हती असे तज्ञ म्हणतात. काही गोष्टी लांबणीवर टाकण्याचे काम राज्यपाल महोदयांनी केले आहे. आता एकदम तडफेने काम चालले आहे. राज्यपाल महोदय अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्यपालांकडे अध्यक्ष निवडीसाठी गेलो मात्र ती झाली नाही. आता चार दिवसात किती वेगाने घटना घडला. महाराष्ट्रातील जनता याचा विचार करत आहे, असे अजित पवारांनी म्हटले.