घरमहाराष्ट्रकोरोनामुळे पतीचं निधन, धक्का सहन न झाल्याने पत्नीची आत्महत्या; २ मुलं झाली...

कोरोनामुळे पतीचं निधन, धक्का सहन न झाल्याने पत्नीची आत्महत्या; २ मुलं झाली पोरकी

Subscribe

कोरोनाने सर्वत्र जनजीवन विस्कळीत केले असून या आजाराने अनेक कुटुंब उद्धस्त झाली आहेत. पिंपरी येथे कोरोनामुळे कुटुंब उद्धस्त झालं आहे. कोरोनामुळे पतीचं निधन झाल्यानंतर विरह सहन न झाल्याने पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली. भोसरी नजीक फुलेनगर परिसरात शुक्रवारी १८ सप्टेंबरला सकाळी ही दुर्दैवी घटना घडली. आईवडिलांच्या जाण्याने दोन मुलं पोरकी झाली आहेत.

गुरुबसप्पा उर्फ प्रकास खाजुरकर ( ३५) यांचं दोन महिन्यांपूर्वी १८ जुलैला निधन झालं. अकरा वर्षांचा मुलगा आणि सात वर्षांची मुलगी आणि आई – पत्नी असा परिवार मागे सोडून गुरुबसप्पा गेल्याने कुटुंबाला धक्का बसला होता. पतीच्या जाण्याने पुढे करायचं काय हा प्रश्न सतावत होता. शिवाय, विरह सहन न झाल्याने गोदावरी गुरुबसप्पा खजुरकर (वय ३०) यांनी गळफास घेऊन जीवन संपवलं. याघटनेने दोन मुलं पोरकी झाली आहेत.

- Advertisement -

आई-वडील हे जग सोडून गेल्याने ही दोन्ही मुलं पोरकी झाली आहेत. घरात आता दोन्ही मुलं आणि त्यांची आजी असे कुटुंब आहे. या मुलांच्या भविष्याचं काय? असा प्रश्न उभा राहिला असतानाच शिवसेना शहर संघटक सुलभा उबाळे यांनी या दोन्ही मुलांचा पुढील सर्व खर्च उचलणार असल्याचं आश्वासन दिलं आहे. शिवाय, माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे हे या दोन्ही मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलणार आहेत.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -