घरAssembly Battle 2022प्रबोधनकारांचे वारस म्हणवणारे लिंबूटिंबूची भाषा करतात; मुख्यमंत्री शिंदेंची ठाकरेंवर टोलेबाजी

प्रबोधनकारांचे वारस म्हणवणारे लिंबूटिंबूची भाषा करतात; मुख्यमंत्री शिंदेंची ठाकरेंवर टोलेबाजी

Subscribe

ज्या प्रबोधनकारांनी कर्मकांडावर सातत्याने प्रहार केले, अंधश्रद्धेच्या विरोधात सातत्याने लढले, अनिष्ठ चालीरितींना विरोध केला, त्याच प्रबोधनकारांचे वारस म्हणवणारे लिंबू, फिरवण्याची, लिंबूटिंबूची भाषा करायला लागले? कुठे चाललो आहोत आपण? मला आठवतंय आम्ही वर्षावर नंतर गेलो, आधी बोललो काय काय आहे ते बघा म्हटलं. आम्हाला वाटीभर लिंबं सापडली तिकडे. सगळं होतं त्यात. लिंबूटिंबूची भाषा करणाऱ्यांनी खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या विचाराबरोबर प्रबोधनकारांच्या विचारांनाही तिलांजली दिली, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देत असताना मुख्यमंत्री शिंदेंनी ही टोलेबाजी केली आहे. तसेच दुसऱ्यावर टीका करण्यााआधी स्वत: आत्मचिंतन आत्मपरीक्षण करा. सत्याला सामोरे जा. या सगळ्याबाबतीत चूक कोणाची आहे स्वत:ला विचारा, असा सल्लाही विरोधकांनी दिला आहे.

आत्मक्लेश करणं वाईट नाही. माणूस जेव्हा चूकतो तेव्हा तो चुक सुधारतो तो त्या माणसाचा मोठेपणा असतो आणि पुढे भविष्यात तो चुकत नाही. पण काही लोक चुकले तरी आम्हीच बरोबर म्हणतो. एक माणूस चुकतो, दोन चुकतात, पाच चुकतात, दहा चुकू शकतात.. पण ५० जण कसं चुकीचे? तरीही एक माणूस म्हणतो ते पन्नास लोक चुकीचे आणि मीच बरोबर असं कसं होऊ शकतं? अजितदादा हे तुमच्या बद्दल नाही बोलत मीत त्यामुळे तुम्ही काळजी करु नका. असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

आम्ही रेशीमबागेत गेलो गोविंदबागेत नाही

आम्ही रेशीमबागेत गेल्यानंतर आम्हाला काय म्हणून हिणवलं, कोणी रेशमाचा किडा म्हणालं कोणी काय म्हणाला. मात्र आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांवर आम्ही सरकार स्थापन केलं, त्यांचे विचार आमच्या डोक्यात, रक्तात आहेत. बाळासाहेबांना अभिप्रेत काम आम्ही केलं म्हणून आम्ही रेशीमबागेत गेलो. आम्ही गोविंदबागेत गेलो नाही. ज्यांना तुमची अंडी पिल्ली माहितीयेत ते आता हिंमत असेल तर मैदानात लढा असं म्हणत आहेत. जे घरातून बाहेरच पडत नाहीत ते हिंमतीची भाषा करतात हा मोठा विनोद आहे. बाळासाहेब पाठीशी उभे राहायचे. तुम लढो, हम कपडे संभालते हे, असं नाही म्हणायचे कधी ते. ते खंबीरपणे उभे राहायचे.

हिऱ्या पोटी गारगोटी

जयंत पाटील सभागृहात नाहीत. पण ते बरोबर बोलत होते. राष्ट्रवादीची शिवसेना.. ते योग्यच बोलले. हे आम्ही अगोदरपासून बोलत होते त्यामुळेच आम्ही बाहेर पडलो. बाप चोरला, पक्ष चोरला वगैरे म्हणत आहेत. मात्र बाळासाहेब ठाकरे हे आम्हाला पितृतुल्यच आहेत. असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. तसंच विचार चोरले म्हणता? ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंचे विचार विकले ते आमच्याविरोधात कसं बोलतात? हिऱ्या पोटी गारगोटी म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

- Advertisement -

बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. रोज एवढी जळजळ, मळमळ होणं तब्येतीसाठी बरोबर नाही असा टोलाही एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे.

उद्योगांकडे मागितलेल्या टक्केवारीची चौकशी

टोमणेसेनेच्या नव्या प्रवक्त्यांनी जिजाऊची उपमा देण्याचे काम केले. उद्योगांच्या जमिनीत काय घोटाळे झाले. उद्योगांकडे कोण टक्केवारी मागायचे याची चौकशी करणार असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. आता उद्योग बाहेर जाताहेत म्हणून आमच्यावर टीका करतात. पण उद्योग असे दोन-तीन महिन्यात बाहेर जात नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही मी फोन केला होता ते देखील तेच म्हणाले. आधीच्या सरकारनेच काही केले नाही म्हणून उद्योग बाहेर गेले. आता जे उदयोगपती आमच्याकडे येतात त्यांना लगेच परवानगी मिळते, असेही शिंदे म्हणाले.

कंगणाचे घर पाडण्यासाठी मनपाचे 80 लाख रुपये वकीलाला दिले

अभिनेत्री कंगना राणावतचे घर तोडण्यासाठी वकिलाला फी म्हणून जनतेच्या पैशातून ८० लाख रुपये दिले. महिला खासदाराला १३ दिवस तुरुंगात टाकले. केंद्रीय मंत्री नारायण राणेंना जेवणाच्या ताटावरून उठविले. पत्रकारांना तुरुंगात टाकले. आमच्या विरोधातही चौकशा लावल्या. देवेंद्रजींनाही अडकवण्याचा प्रयत्न केला. गिरीश महाजन यांचा तर पूर्ण कार्यक्रमच करून ठेवला होता.ही सत्तेची मस्ती नव्हती काय? असा सवाल शिंदे यांनी केला. कायदा आणि सुव्यवस्था आम्हाला कोणी सांगायची,ज्यांचा गृहमंत्रीच तुरुंगात गेला आणि दुसरा मंत्री दाऊदसोबतच्या संबंधांवरून तुरुंगात आहे, याकडे शिंदे यांनी लक्ष वेधले.

पोलिसांनी चार हजार कोटीचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. लहान मुलांच्या पोर्नोग्राफीवर कारवाई करून मोठया प्रमाणात अटक केली. बलात्काराच्या गुन्ह्याच्या दोषसिद्धीत वाढ झाली आहे. वेश्याव्यवसायात अल्पवयीन मुलींची सुटका करण्यासाठी मोठी मोहीम राबवली. निर्भया पथकासाठी ७६८ वाहने खरेदी करण्यात आली. पोलिसांचे सक्षमीकरण करण्यात येत आहे.सायबर इंटेलिजन्सची स्थापना केली आहे. ऑनलाईन जुगार रोखण्यासाठी कायदा करणार आहोत. शक्ती कायदा देखील केंद्राकडे पाठवला आहे त्याला देखील लवकर मान्यता मिळेल, असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले


अडीच वर्ष बाहेर न पडणारा मुख्यमंत्री दाखवा, बक्षीस मिळवा; मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -