घरमहाराष्ट्रमहाविकास आघाडीची बुद्धी गुडघ्यात, चंद्रकांत पाटलांचा निशाणा

महाविकास आघाडीची बुद्धी गुडघ्यात, चंद्रकांत पाटलांचा निशाणा

Subscribe

शरद पवारांचा निशाणा कोणा दुसऱ्यावरच होता, त्यांना समजणं सोपं नाही. आपल्याकडून कोणी काही तरी शिकावं. शरद पवारांना काल दुपारीच समजलं पराभव होणार आहे, तर ते पुण्याला गेले. राज्यसभा निवडणुकीची कुस्ती फडवणीसांनी खेळली, असंही चंद्रकांत पाटील म्हणालेत.

मुंबईः महाविकास आघाडीची बुद्धी गुडघ्यात असल्याचं निकालातून स्पष्ट झालं. बुद्धीचा चमत्कार महाविकास आघाडीच्या लक्षात आला नाही, असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केलाय. चंद्रकांत पाटलांनी भाजपच्या विजयानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधलाय, त्यावेळी ते बोलत होते.

यश हे सगळ्यांचं उत्तर आहे, म्हणून शरद पवारांनीही देवेंद्र फडणवीसांचं कौतुक केलं. देवेंद्र फडणवीस लोकांना प्रेम देतात. शरद पवारांचा निशाणा कोणा दुसऱ्यावरच होता, त्यांना समजणं सोपं नाही. आपल्याकडून कोणी काही तरी शिकावं. शरद पवारांना काल दुपारीच समजलं पराभव होणार आहे, तर ते पुण्याला गेले. राज्यसभा निवडणुकीची कुस्ती फडवणीसांनी खेळली, असंही चंद्रकांत पाटील म्हणालेत.

- Advertisement -

काही लोक मोडेन पण वाकणार नाही असे होते, मोडेन पण वाकणार नाही भूमिकेतून ते वाकले नाहीत आणि त्यांच्यावर राज्यसभा निवडणूक लादली आणि मग अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली. महान नेते संजय राऊतांना सहाव्या नंबरवर जावं लागलंत. ते हुशार असतील तर विधान परिषदेच्या निवडणुकीत 13 तारखेला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख आहे, दोन दिवस आहेत, देवेंद्रजी प्रेमळ आहेत. माणसांना रिसिव्ह करतात, असं म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीसांचं कौतुक करत संजय राऊतांना इशारा दिलाय.

भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनीही यावर प्रतिक्रिया दिलीय. भाजप निवडून आल्याने अनेकांच्या तोंडचं पाणी पळालं. काहींचे चेहरे पडले, काही लोकं तर बावचळले तर काही पिसाटलेत”, अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. राज्यसभा निवडणुकीतील विजयानंतर आज मुंबईतील पक्ष कार्यालयात भाजपने विजयाचा जल्लोष साजरा केला. त्यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीसांनी हल्लाबोल केलाय.

- Advertisement -

हेही वाचाः भाजपच्या विजयाने काही लोकं बावचळले, पिसाटलेत; फडणवीसांचा मविआवर हल्लाबोल

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -