घरमुंबईराजभवनात सापडल्या जुळ्या तोफा

राजभवनात सापडल्या जुळ्या तोफा

Subscribe

राज्याचे राज्यपाल यांच्या निवासस्थान असलेल्या राजभवन येथे प्रत्येकी २२ टन वजनाच्या दोन ब्रिटिशकालीन तोफा सापडल्या आहेत.

राज्याचे राज्यपाल यांच्या निवासस्थान असलेल्या राजभवन येथे प्रत्येकी २२ टन वजनाच्या दोन ब्रिटिशकालीन तोफा सापडल्या आहेत. या दोन्ही तोफा क्रेनच्या मदतीने बाहेर काढण्यात आल्या. या तोफा अनेक दशकं मातीखाली दबून होत्या. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी या तोफांचे जतन राजभवनावरच करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच या तोफांचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन राज्यपालांनी नौदलाच्या तज्ज्ञांची मदत घेऊन तोफांची तांत्रिक माहिती घेण्याचे तसेच तोफांचे जुने अभिलेख असल्यास तपासण्यास सांगितले.

- Advertisement -

अनेक वर्षांपासून तोफा पडून होत्या 

या जुळ्या तोफा राजभवनातील जल विहार हॉलच्या समोर दर्शनी भागात ठेवण्याची देखील राज्यपालांनी सूचना केली आहे. त्यामुळे नागरीकांना या तोफा पाहता येणार आहेत. राजभवन येथे प्रवेश केल्यावर समोरच असलेल्या गार्डनजवळ समुद्राच्या दिशेने तळाशी काही महिन्यांपूर्वी वृक्षारोपण सुरू असताना कर्मचार्‍यांना मातीमध्ये दबलेल्या दोन वजनदार तोफा दिसल्या. अनेक वर्षे या तोफा पडून राहिल्या असल्याने त्या झाकल्या गेल्या होत्या.

दोन्ही तोफा क्रेनच्या मदतीने उचलण्यात आल्या

या तोफांचे वजन प्रत्येकी २२ टन असून लांबी ४.७ मीटर, तर अधिकतम व्यास १.१५ मीटर इतका आहे. दोन्ही तोफा क्रेनच्या मदतीने ५० मीटर उंच उचलण्यात आल्या व त्यानंतर राजभवनाच्या हिरवळीवर ठेवण्यात आल्या. २०१६ साली राज्यपालांच्या निवासस्थानाखाली सापडलेल्या भूमिगत बंकरच्या परिरक्षणाचे काम एका तज्ज्ञ वास्तुविशारद फर्मच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. हे काम झाल्यानंतर त्याठिकाणी संग्रहालय निर्माण करून बंकर जनतेसाठी खुले करण्यात येणार आहे. त्यात या तोफांचा शोध लागला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -