घरमुंबईमनसेच्या चेंबूर विभागअध्यक्षांवर प्राणघातक हल्ला

मनसेच्या चेंबूर विभागअध्यक्षांवर प्राणघातक हल्ला

Subscribe

मनसेचे चेंबूर विभागअध्यक्ष कर्णबाळा दुनबळेंवर तलवारीवनं प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. सध्या त्यांच्यावर सायन रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

मनसेचे चेंबूर विभागअध्यक्ष कर्णबाळा दुनबळेंवर तलवारीवनं प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. सध्या त्यांच्यावर सायन रूग्णालयात उपचार सुरू आहेत. दुनबळे यांच्या डोक्याला गंभीर जखमा झाल्या असून त्यांच्या नाकातून देखील रक्तस्त्राव होत आहे. मात्र, त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. कर्णबाळा दुनबळे यांच्यावर हल्ला का झाला? यामागील कारण मात्र कळू शकले नाही. ऑक्टोबर महिन्यामध्ये शिवसेना आमदार तुकाराम काते यांच्यावर मानखुर्दमध्ये प्राणघातल हल्ला करण्यात आला होता. त्यामध्ये सुदैवानं काते बचावले होते. दुनबळे यांच्या काम करण्याचा पद्धतीला कंटाळून मनसेचे चेंबूर शाखाध्यक्ष तसेच इतर पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरेंकडे आपले राजीनामे पाठवले होते. दरम्यान, कर्णबाळा दुनबळे यांच्या हल्ल्याचा तपास सुरू आहे.

वाचा – शिवसेना आमदार तुकाराम कातेंच्या हल्लेखोरांना अटक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -