घरमुंबईवरळी येथे लागलेल्या भीषण आगीत २ महिलांचा मृत्यू तर २ जण...

वरळी येथे लागलेल्या भीषण आगीत २ महिलांचा मृत्यू तर २ जण जखमी

Subscribe

गंभीर जखमी झालेलया दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून उर्वरित दोघांना मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात उपचारांसाठी नेण्यात आले आहे. गंभीर जखमी झालेलया दोघांवर कस्तुरबा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

मुंबई, वरळी(worli) येथे एका इंडस्ट्रीजवळील दुमजली चाळीत भीषण आग लागल्याची दुर्दैवी घटना घडली. दुमजली चाळीतील एका रूममध्ये असलेल्या एसी युनिटमध्ये आग लागल्यामुळे ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील चारजण जखमी झाले. त्यापैकी गंभीर जखमी झालेलया दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून उर्वरित दोघांना मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात उपचारांसाठी नेण्यात आले आहे. गंभीर जखमी झालेलया दोघांवर कस्तुरबा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

हे ही वाचा – मेट्रो ३ च्या प्रकल्‍पखर्चात १० हजार कोटींची वाढ; वाढीव खर्चाला मंत्रिमंडळाची मान्यता

- Advertisement -

आग लागण्याची ही दुर्दैवी घटना सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. दरम्यान या घटनेप्रकरणी पोलीस व अग्निशमन दल यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली. पोलीस व अग्निशमन दल यांच्याकडून चौकशी सुरू आहे. चौकशी दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार वरळी मधील गणपतराव कदम मार्ग, ए टू झेड इंडस्ट्रीनजीकच्या दुमजली मरियम मेंशन या दुमजली चाळीतील दुसऱ्या मजल्यावरील एका रूममधील एसी युनिटमध्ये सोमवारी मध्यरात्री २.४० वाजताच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली.

हे ही वाचा – शिवबंधन ते रक्षाबंधन: महापालिका परिचारिकांनी उद्धव ठाकरेंना राखी बांधत मानले आभार

- Advertisement -

या घटनेत राठोड कुटुंबातील चारजण जखमी झाले. यामध्ये, गंभीर जखमी लक्ष्मी तेजा राठोड (५० / महिला) यांचा मंगळवारी मध्यरात्री ३.३० वाजताच्या सुमारास कस्तुरबा रूग्णालयात मृत्यू झाला. तर आणखीन एक गंभीर जखमी मधू तेजा राठोड (३८/ महिला) यांचा मंगळवारी सकाळी १० वाजता नायर रूग्णालयात दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र धीरज राठोड (४१) आणि तेजा कला राठोड (७१) हे दोघेजण सुखरूप असून त्यांच्यावर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आता त्या दोघांची प्रकृती स्थिर असल्याचे रूग्णालय प्रशासनाने कळवले आहे.

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -