घरमुंबईमुंबईतील चेंबूर येथे घरांच्या प्रकल्पासाठी दोन हजार घरे बांधणार; प्रकल्पासाठी एकूण ६८२...

मुंबईतील चेंबूर येथे घरांच्या प्रकल्पासाठी दोन हजार घरे बांधणार; प्रकल्पासाठी एकूण ६८२ कोटींचा खर्च

Subscribe

मुंबई महापालिका प्रत्येक सदनिकेमागे ३४ लाख १३ हजार ७०० रुपये याप्रमाणे तब्बल ६८२ कोटी ७४ लाख रुपये खर्च करणार आहे. अशी माहिती महा पालिकेकडून देण्यात आली.

मुंबई, मुंबई(mumbai) महापालिका रखडलेल्या विकासकामांना चालना देण्यासाठी चेंबूर(chembur) येथे प्रकल्प बाधितांसाठी प्रत्येकी ३०० चौरस फुटांची दोन हजार घरे बांधणार आहे. त्यासाठी महा पालिका प्रत्येक सदनिकेमागे (house) ३४ लाख १३ हजार ७०० रुपये याप्रमाणे तब्बल ६८२ कोटी ७४ लाख रुपये खर्च करणार आहे. अशी माहिती महा पालिकेकडून देण्यात आली.

हे ही वाचा – मरिन ड्राईव्ह परिसरातील इमारतींवर भव्य विद्युत रोषणाई; नागरिकांच्या सहभागातून २४ लाखांचा निधी

- Advertisement -

मुंबई(mumbai bmc) महापालिकेचे अनेक प्रकल्प, विकास कामे, योजना आदी राबविण्यात प्रकल्प बाधित अडथळा ठरत आहेत. पालिकेला या प्रकल्प वाधितांना नियमाने पर्यायी घरे देण्यासाठी जागेची कमतरता भासत आहे. पालिकेला सध्या 36 हजार सदनिका उभारण्याची आवश्यकता आहे. मात्र पालिकेकडे जागेची अडचण आहे. त्यामुळे पालिकेच्या अनेक विकास कामांवर त्याचा परिणाम होत आहे. विकास कामे, योजना, प्रकल्प रखडल्याने त्यावरील खर्चात म्हणजे कंत्राट रकमेत भरमसाठ वाढ होत आहे. याचा पालिकेला आर्थिक भुदंड पडत आहे.

हे ही वाचा – रविवारी मेगाब्लॉक! मध्य आणि हार्बर मार्गावरील प्रवाशांनी ‘हे’ वेळापत्रक वाचाच!

- Advertisement -

माहुल पंपिंग स्टेशनचे महत्वाचे काम पालिकेकडे पर्यायी जागा, सदनिका नसल्याने रखडले आहे. तसेच, चेंबूरमधील आणखीन काही ठिकाणी पालिकेची विकास कामे रखडली आहेत. ही सर्व कामे मार्गी लावण्यासाठी पालिका प्रयत्नशील आहे.पालिका एम/पूर्व चेंबूरमध्ये तब्बल 2 हजार 68 घरे बांधणार आहे. यासाठी पालिका 682 कोटी 74 हजार रुपये खर्च करणार आहे. पालिकेने प्रकल्प बाधितांच्या घरांची कमतरता दूर करण्यासाठी खासगी विकासकाच्या माध्यमातून जागेच्या बदली जागेचा टीडीआर किंवा बांधकामाच्या बदली बांधकाम टीडीआर देऊन घरे बांधण्याचे धोरण आखले आहे.

हे ही वाचा – ‘हर घर तिरंगा’ अभियान जनजागृतीसाठी ‘ई’ विभागात एकाचवेळी ७ ठिकाणांहून निघाली प्रभातफेरी

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -